उल्हास नदी पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील काळू नदीच्या पातळीतही वाढ!
By सुरेश लोखंडे | Published: July 19, 2023 11:18 PM2023-07-19T23:18:39+5:302023-07-19T23:19:10+5:30
प्रशासनाची यंत्रणा लक्ष ठेवून आहे.
सुरेश लोखंडे, ठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या दरम्यान जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही ही पावसाचा जोर कायम आहे. तर ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी व उपयुक्त उल्हास नदीने बदलापूर, मोहने आणि जांभूळ पाडा या शहराजवळ धोक्याची पातळी ओलांडली.
त्या पाठोपाठ मोठी नदी असलेल्या काळू नदीने टिटवाळा जवळील परिसरात व खडवली च्या किनार्या लगर १०२ मीटरची ईशारा पातळी गाठली आहे. सध्या परिसरात पावसाचा जोर कमी आहे. पण नदीच्या उगम ठिकाण पाधसाचा जोर कायम राहिल्यास या पातळीच्या वर पाणी होऊन धोक्याची पातळी कोणत्याही क्षणी येण्याची दाट शक्यता आहे. यावर प्रशासनाची यंत्रणा लक्ष ठेवून आहे.