ठाणे शहरातील पनीर उत्पादकांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

By अजित मांडके | Published: September 8, 2023 08:22 PM2023-09-08T20:22:57+5:302023-09-08T20:23:06+5:30

४ लाखांहून अधिक किंमतीचे पनीर, दूध व इतर साहित्य जप्त

Food and Drug Administration action against cheese producers in Thane city | ठाणे शहरातील पनीर उत्पादकांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

ठाणे शहरातील पनीर उत्पादकांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

googlenewsNext

ठाणे : जिल्ह्यातील दूध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या मार्फत जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने वागळे इस्टेट भागातील दोन दूध डेअरींची अचानक तपासणी  केली. अस्वच्छ वातावरणात पनीर तयार करत असल्याचे यावेळी आढळून आले. या कारवाईत सुमारे ४ लाख १ हजार ३७४ रुपये किंमतीचे पनीर, दूध व इतर साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली आहे.

  ठाणे विभागाने ठाणे परिसरातील वागळे इस्टेट मधील मे. केवला डेअरी या उत्पादक पेढीची अचानक तपासणी केली असता या ठिकाणी अस्वच्छ वातावरणात पनीरचे उत्पादन होत असल्याचे आढळून आहे. या ठिकाणी पनीर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे म्हशीचे दूध आणि पनीर या अन्न पदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेऊन म्हशीचे ५९८ लिटर दूध व ७९ किलो पनीर असा एकूण ४५ हजार ३१६ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यापैकी म्हशीचे दूधाचा साठा नाशवंत असल्याने नष्ट करण्यात आला. 

वागळे इस्टेट, राम नगर येथील मे. यादव मिल्क प्रोडक्ट्स या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनच्या पथकाने अचानक तपासणी केली असता या पेढीत पनीर आणि पनीर अॅनलॉग तयार करीत असल्याचे आढळले. हे उत्पादन अत्यंत अस्वच्छ वातावरणात विनापरवाना करीत असल्याने या ठिकाणी स्वच्छता करून परवाना घेईपर्यंत पेढी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या ठिकाणी पनीर, पनीर ॲनलॉग, स्कीमड मिल्क, सायट्रिक ॲसिड, मोनोसोडियम ग्लोउटेण, रिफाईन्ड पामोलीन ऑईलचे नमुने घेण्यात आले. यावेळी सुमारे ३ लाख ५६ हजार ५८ रुपये किंमतीचे पनीर, पनीर अनॅलॉग, दूध, रिफाईंड पामोलिव्ह ऑइल व इतर साठा जप्त करण्यात आला आहे.  तसेच ३८२ किलो पनीर व पनीर अँनलॉग, २८ लिटर दूध, सायट्रिक असिड, 2893.4 किलो रिफाईंड पामोलिव्ह ऑईल आदी साठा जप्त करण्यात आला आहे.

सहाय्यक आयुक्त (अन्न) व्यंकटेश वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी इंद्रजीत चिलवंते, अन्न सुरक्षा अधिकारी राहुल ताकाटे, त्यांचे समवेत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.शमा शिरोडकर, वैद्यमापन शास्त्रचे निरीक्षक जी. बी. पवार, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयाचे एम.टी. रणदिवे, व पोलीस शिपाई एम.डी. घुगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या ठिकाणी आस्थापनेमध्ये अन्नपदार्थांच्या विक्रीसाठी उत्पादन करताना कोणतीही खबरदारी घेत नसल्याचे, जनहित व जन आरोग्याच्या दृष्टीकोनातून,  त्रुटींची पूर्तता करीत नसल्याने तसेच अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नियम व नियमने २०११ अंतर्गत या आस्थापनेस तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता करेपर्यत अन्न सुरक्षा मानके कायदा (अन्न परवाने व नोंदणी) नियमन २०११ चे नियमन २.१.१४(१) अंतर्गत असलेल्या निर्देशांचे तंतोतत पालन करणे अन्न व्यवसायाच्या चालकावर बंधनकारक असून त्याचे उल्लंघन केल्यास हे उल्लंघन अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ चे कलम ५५ अंतर्गत २ लाखापर्यंतच्या द्रव्य दंडास पात्र ठरते, असे सहआयुक्त देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Food and Drug Administration action against cheese producers in Thane city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.