वासिंद जवळील भातसई आश्रम शाळेतील ३५० विद्यार्थ्यांना अन्नातुन विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 05:30 PM2024-01-31T17:30:43+5:302024-01-31T17:34:11+5:30
१० विध्यार्थ्यांची प्रकृती गंभीर.
शाम धुमाळ, ठाणे : तालुक्यातील वासिंद परिसरातील भतसई येथील संत गाडगे महाराज प्राथमिक व माद्यमिक आश्रम शाळेतील ३५०विध्यार्थ्यांना डाळ, भात,भाजी,गुलाबजाम आले होते आज दुपारच्या सत्रात विध्यार्थ्यांना जेवण दिले असता जेवण झाल्यावर विध्यार्थ्यांना उलटी ,मळमळ,सह अस्वस्थ वाटू लागले अनेक विध्यार्थी चक्कर येऊन पडले सदर बाब व्यवस्थापना च्या लक्षात येताच शाळेतील शिक्षकांनी स्थानिकांच्या मदतीने विध्यार्थ्यांना खासगी वाहणाने तात्काळ शहापूर उपजिल्हा रुग्णालयात् दाखल केले .
विषबाधा झालेल्या विध्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु असून शहापूर उपजिल्हा रुगनालयात ६० जन उपचार घेत असून त्या पैकी १० विध्यार्थ्यांची प्रकृती गभीर् आहे .