ठाण्यात गटाराच्या लोखंडी जाळीत अडकला महिलेचा पाय: तासाभराने झाली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:00 PM2018-01-29T22:00:07+5:302018-01-29T22:26:01+5:30

ठाण्यातील राम मारुती रोडवरील एका गटाराच्या लोखंडी जाळीत सोमवारी सायंकाळच्या सुमारास महिलेचा पाय अडकला होता. त्यामुळे शहरातील लोखंडी जाळयांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

 Footprints of stolen woman in Thane; | ठाण्यात गटाराच्या लोखंडी जाळीत अडकला महिलेचा पाय: तासाभराने झाली सुटका

तासाभराने झाली सुटका

Next
ठळक मुद्देमदतीसाठी पाऊण तासाची प्रतिक्षाबघ्यांच्या गर्दीमुळे मदतीला अडथळावाहतूक कोंडीचाही अग्निशमन दलाला फटका

ठाणे: येथील राम मारुती रोड परिसरातील एका गटाराच्या लोखंडी जाळीमध्ये जयश्री रेमडे (५४) या महिलेचा पाय अडकल्यामुळे तिच्यासह स्थानिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली होती. तासाभराच्या प्रयत्नानंतर ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या मदतीमुळे तिची या जाळीतून अखेर सुटका झाली आणि तिने सुटकेचा नि:श्वास सोडला.
तीन हात नाका येथील ‘दिपज्योती’ सोसायटीमध्ये राहणा-या जयश्री या आपल्या पतीसमवेत सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे स्टेशनकडे जात होत्या. त्याचवेळी राममारुती रोडवरील ‘राजमाता वडापाव’या दुकानासमोरील एका गटाराच्या चेंबरवरील लोखंडी जाळीत त्यांचा डावा पाय अडकला. हा पाय तसाच गटारात गेल्याने त्या अर्धवटपणे खाली पडल्या. पाय बाहेरच निघत नसल्यामुळे त्यांनी बरीच आरडाओरड केली. प्रयत्न करुनही पाय निघत नव्हता. त्यावेळी रस्त्यावरुन जाणा-या रिना राजे या महिलेने वाहतूक पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाचारण केले. तेंव्हा अर्ध्या तासाने तिथे पोहचलेल्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांची या जाळीतून सुटका केली. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्या पायाला सूज आली सुदैवाने गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. दरम्यान, जयश्री यांचा पाय अडकल्यानंतर त्यांना मदत करण्याऐवजी बघ्यांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळेही मदत कार्यात अडथळे येत होते. तर वाहतूक कोंडीमुळे अग्निशमन दलालाही पोहचण्यास उशिर झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. पाय अडकल्यापासून ते त्यातून सुटका होईपर्यंत मात्र या महिलेची भीतीने गाळण उडाली होती. पहाटेच्या दरम्यान कोणीतरी भंगार वेचकाने ही लोखंडी जाळी तोडण्याचा प्रयत्न केला असावा, त्यामुळेच ती तुटल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पालिका प्रशासनाने या जाळयांची निगा ठेवली पाहिजे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

Web Title:  Footprints of stolen woman in Thane;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.