कॅन्सर रुग्ण अन् महिला सक्षमीकरणसाठी;उल्हासनगरातील महिलेने घेतली महिला सौंदर्य स्पर्धा

By सदानंद नाईक | Published: February 26, 2023 06:28 PM2023-02-26T18:28:35+5:302023-02-26T18:48:33+5:30

स्पर्धेला मंत्री मंगलप्रभात लोढा, अभिनेत्री अंकिता लोखंडे आदीजन उपस्थित होते.

For cancer patients and women empowerment; a woman from Ulhasnagar took part in a women's beauty pageant | कॅन्सर रुग्ण अन् महिला सक्षमीकरणसाठी;उल्हासनगरातील महिलेने घेतली महिला सौंदर्य स्पर्धा

कॅन्सर रुग्ण अन् महिला सक्षमीकरणसाठी;उल्हासनगरातील महिलेने घेतली महिला सौंदर्य स्पर्धा

googlenewsNext

उल्हासनगर : महिला सक्ष्मीकरण व कैंसर पेशंट संदर्भात जनजागृति करुन समाजहितासाठी समाजसेविका जयश्री रगडे व साज इव्हेंट अँड एंटरटेनमेंट द्वारा पहिली सौंदर्य प्रतियोगिता २०२३ मुंबई येथील ताज प्रेसिडेंट हॉटेल संपन्न झाली. स्पर्धेला मंत्री मंगलप्रभात लोढा, अभिनेत्री अंकिता लोखंडे आदीजन उपस्थित होते.

उल्हासनगरातील समाजसेविका जयश्री रगडे यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या ब्युटी पेजंट मध्ये गृहिणीं व विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांनी देखील भाग घेतला. महिला सक्षमीकरण व कैंसर पेशंट संदर्भात जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा सामाजिक हेतू असल्याची माहिती रगडे यांनीं दिली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता, आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी अभिनेत्री अंकिता लोखंडे, मंजु लोढा, उल्हासनगर महापालिका माजी महापौर पंचम कालानी, चेतन देवळेकर, रेखा ठाकुर, राजु बलवानी, नितिन तायडे, राज असरोंडकर, कमलेश निकम, कल्याणी नंदकिशोर, अरमान ताहिल व संजीवनी पाटिल आदींची उपस्थिती होती.

 सौंदर्य स्पर्धेच्या मिस कैटेगरी मध्ये ज्योती अहिरे विजयी झाल्या असून पहिली रनर अप मिताली पळसोदकर तर दूसरी रनर अप पूजा वाघमारे ठरल्या. तसेच मिसेस कैटेगरी मध्ये तृप्ती वाघ विजयी ठरल्या असून पहिली रनरअप जीया जैस्वाल व दूसरी रनरअप म्हणुन सुवर्णा भदाणे पाटील हें विजेत्या ठरल्या आहेत. कॅन्सर सारख्या आजारावर मात करून विजय प्राप्त करणाऱ्या केंसर सर्वाइवर ऋषिकेश देशमुख, अनिता लाड यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयश्री रगडे, सिद्धेश सावंत, सुराज कुटे यानी परिश्रम घेतले, प्रतियोगिता ज्यूरी म्हणून अनघा कामत सांबरी, विनिता भाटिया, रूपल मोहता, सुरुची, पूनम गिरी यांनी काम पाहिले. तर ग्रूमर्सच्या रुपात डॉ रुपाली सानप, निता लहरानी, मयुरी धवणे, सौम्य रेश्मा, प्रीती शाह यानी साथ दिली. 

Web Title: For cancer patients and women empowerment; a woman from Ulhasnagar took part in a women's beauty pageant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.