दुसऱ्या-तिसऱ्यांदा टेम्पो भरून मद्य वाहतूक करणार्यांवर मोकाखाली कारवाई! - देसाई

By सुरेश लोखंडे | Published: October 31, 2022 06:17 PM2022-10-31T18:17:57+5:302022-10-31T18:18:19+5:30

एखाद्या राज्यातून दुसरा राज्यामध्ये मद्याच्या काही बॉटल आणण्यासाठी परवानगी आहे. परंतु काही लोक टेम्पो,अनेक वाहन भरून आणतात

For the second-third time, action will be taken against those who transport alcohol by filling the tempo! - Desai | दुसऱ्या-तिसऱ्यांदा टेम्पो भरून मद्य वाहतूक करणार्यांवर मोकाखाली कारवाई! - देसाई

दुसऱ्या-तिसऱ्यांदा टेम्पो भरून मद्य वाहतूक करणार्यांवर मोकाखाली कारवाई! - देसाई

googlenewsNext

ठाणे :

एखाद्या राज्यातून दुसरा राज्यामध्ये मद्याच्या काही बॉटल आणण्यासाठी परवानगी आहे. परंतु काही लोक टेम्पो,अनेक वाहन भरून आणतात, अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे. एकच व्यक्ती दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा गुन्हा करताना आढळला तर त्याच्यावर मोका लावण्यात येईल. असा गुन्हा केलेल्या व्यक्ती आम्ही शोधत आहोत. अशी व्यक्ती आढळल्यास मोकासाठी त्याचा प्रस्ताव आम्ही पोलीस महासंचालकरांकडे पाठवणार, माझ्या विभागातील आयुक्तांना असे आदेश देण्यात आलेले आहेत, असे उत्पादन शुल्क मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ठाण्यात स्पष्ट केले.

राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये जिजाऊ सामाजिक संस्थेच्यावतीने कोरोना काळात उत्कृष्ट कार्यकरणाºया विशेषत: महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी महिलांसाठी कृतज्ञतेची भाऊबीज हा उपक्रम घेतला. त्यासाठी देसाई ठाण्यात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. एखाद्या राज्यातून दुसरा राज्यामध्ये काही बॉटल आणण्यासाठी परवानगी आहे. परंतु काही लोक टेम्पो तसेच अनेक वाहन भरून आणतात. हा एकच गुन्हा दुसºयांदा, तिसऱ्यांदा करणाऱ्या व्यक्तीवर मोका लावण्याचा प्रस्ताव आम्ही पोलीस महासंचालकरांकडे पाठवणार आहे. माझ्या विभागातील अधिकाºयांना आदेश दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोना काळात वापरलेल्या निधीची कॅटव्दारे चौकशी करणार असल्याचे त्यांना विचारले असता ‘मुख्यमंत्री यांनी अशा प्रकारचे आदेश दिले असेल तर त्या पद्धतीने चौकशी केली जाईल. शेवटी पैसा जनतेचा आहे. कोविडच्या काळात लोकांच्या गरजेसाठी, आरोग्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता. जर यात काही गैरव्यवहार आढळून आले असतील तर चौकशी केली जाईल व चौकशी अंती हे सर्व पुढे येईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले. सुरक्षा काढण्याविषयी ते म्हणाले, ज्या व्यक्तींना सुरक्षिततेची आवश्यकता आहे. त्यांना सुरक्षा देण्यासाठी पोलीस विभागाकडे एक वरिष्ठ अधिकाºयांची समिती आहे. ती समिती सुरक्षितेचा आढावा घेत असते व त्यानुसार सुरक्षा वाढवली जाते किंवा कमी केली जाते. हा पोलिसांच्या नियमित कामकाजाचा भाग आहे. अधिकारी सगळे अहवाल तपासूनच त्या व्यक्तीची सुरक्षा कमी किंवा वाढवत असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरक्षेसाठी शिवसैनिकांचे कवच असल्याचे खासदार विनाकत राऊन यांनी सांगित्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले असता त्यासाठी त्यांचे स्वागत असल्याचे देसाई म्हणाले. उद्योगांबाबत ते म्हणाले आमचं सरकार आल्यानंतर तीन महिन्यात आम्ही उद्योगांविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे एकही उद्योग बाहेर गेला नाही. पण महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्याबरोबर कोणी चर्चा केली नाही? मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झालेली नाही, हाय पावर कमिटीची बैठक झाली नाही. त्यांच्या काळात जी दिरंगाई झाली त्यांना कंटाळून हे उद्योग बाहेर गेलेले आहेत. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या उद्योगांपेक्षा मोठे उद्योग आणण्याची चर्चा केंद्राशी करत आहेत असल्याचे सुतोवाच देसाई यांनी केले.

Web Title: For the second-third time, action will be taken against those who transport alcohol by filling the tempo! - Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.