विवाहितेच्या गळ्यातील अडीच लाखांच्या दागिन्यांची जबरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:52 AM2021-02-20T05:52:47+5:302021-02-20T05:52:47+5:30

ठाणे : मोटारसायकलने आलेल्या दोघांनी रिक्षाने जाणाऱ्या एका ५४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील दोन लाख ४० हजारांच्या दोन सोनसाखळ्या जबरीने ...

Forced theft of jewelery worth Rs 2.5 lakh from a married woman's neck | विवाहितेच्या गळ्यातील अडीच लाखांच्या दागिन्यांची जबरी चोरी

विवाहितेच्या गळ्यातील अडीच लाखांच्या दागिन्यांची जबरी चोरी

Next

ठाणे : मोटारसायकलने आलेल्या दोघांनी रिक्षाने जाणाऱ्या एका ५४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील दोन लाख ४० हजारांच्या दोन सोनसाखळ्या जबरीने खेचून पलायन केल्याची घटना वागळे इस्टेट येथे बुधवारी घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्तकनगर येथे राहणारी ही महिला तिच्या मैत्रिणींसह रिक्षाने वागळे इस्टेट येथील फिटनेस फॅक्टरी जीमसमोरील रस्त्याने १७ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास जात होती. त्याचवेळी अचानक विरुद्ध दिशेने आलेल्या एका मोटारसायकलवरील दोघांपैकी मागे बसलेल्याने तिच्या गळ्यातील एक लाख ९० हजारांचे साडेपाच तोळे वजनाची सोनसाखळी आणि दीड तोळे वजनाची एकपदरी ५० हजारांची दुसरी सोनसाखळी अशा दोन सोनसाखळ्यांची जबरी चोरी करून पलायन केले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बी.एस. निकुंभ हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Forced theft of jewelery worth Rs 2.5 lakh from a married woman's neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.