जबरी चोरी, घरफोडी गहाळ झालेले ९८ मोबाइल हस्तगत; अन्य एका प्रकरणात एक सराईत आरोपी अटकेत
By अजित मांडके | Published: March 1, 2023 05:48 PM2023-03-01T17:48:10+5:302023-03-01T17:48:16+5:30
मागील काही दिवसात नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.
ठाणे : नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, घरफोडी तसेच गहाळ झालेले मोबाइल अशा घटना मोठ्या प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी येत्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी तपास करुन ९८ मोबाइल हस्तगत केले आहेत. यात घरफोडीचे ७, चोरीचे ४, जबरी चोरी २ आणि इतर १७ असे मिळून ९८ मोबाइल हस्तगत केले आहेत. तर दुसºया एका घटनेत घरफोडी चोरी, मोटारसायकल व लॅपटॉप चोरी करणाºया सराईत आरोपीसही मुद्देमालासह अटक करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त गणेश गावडे यांनी दिली. त्याच्याकडून ४ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मागील काही दिवसात नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यानुसार परिमंडळ एक चे पोलीस उपआयुक्त गणेश गावडे यांनी दिलेल्या सुचनेच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस आयुक्त विलास शिंदे, वरीष्ठ पोलीस निरिक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या टीमने सीईआयआर पोर्टल व आॅनलाईन उपलब्ध टुल्स, मोबाइल शोध अॅपचा वापर करुन लोकशेन ट्रेस करुन तब्बल ९८ मोबाइल हस्तगत केले आहेत. यात कनार्टक ०१, उत्तरप्रदेश ०३, मध्यप्रदेश ०२, गुजरात ०१, मुंबई शहर ०५, लातुर ०१, पूणे ०२ आणि जालना, बीड येथून १ अशा पध्दतीने इतर जिल्हे आणि राज्यातून देखील मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत.
दुसऱ्या एका घटनेत नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० फेब्रुवारी रोजी फिर्यादी हे आपल्या परिवारासह राहत्या घरात दरवाजा बंद करुन झोपले असतांना अज्ञात चोराने घरात प्रवेश करुन १६ हजार रुपये किमंतीचे ४ मोबाइल फोन चोरी करुन पळून गेला. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर घटनास्थळावरील मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ३ टीम तयार करुन घटनास्थळापासून मुंब्रा पर्यंतचे सुमारे ३० ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करुन मिळालेल्या माहितीच्या आधारे सलग तीन दिवस मुंब्य्रात आरोपीचा शोध घेण्यात आला. त्यानंतर शिताफीने अब्दुल समद नुरमोहम्मद सखानी (२७) रा. कौसा, मुंब्रा याला अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, ५ मोबाइल, एक लॅपटॉप, दोन मोटारसायकल असा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला. त्याच्या विरोधात नौपाडा ४, कळवा १ व ठाणेनगर १ असे एकूण ६ गुन्हे उघड करण्यात आले आहेत. त्याच्याकडून ५ मोबाइल फोन, एक लॅपटॉप, दोन दुचाकी असा ४ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.