खंडणी देण्यास नकार देणाऱ्या मासळी विक्रेत्याच्या मोबाईलची जबरीने चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 08:56 PM2021-03-29T20:56:58+5:302021-03-29T20:59:30+5:30

खंडणी देण्यास नकार देणाºया बादरुद्दीन शेख (४५, रा. मुंबई) या मासळी विक्रेत्याच्या मोबाईल आणि काही रोकडची २५ ते ३० वयोगटातील दोन लुटारुंनी जबरीने चोरी केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

Forcible theft of a fishmonger's mobile phone for refusing to pay a ransom | खंडणी देण्यास नकार देणाऱ्या मासळी विक्रेत्याच्या मोबाईलची जबरीने चोरी

ठाण्यातील घटना

Next
ठळक मुद्देरोकडही लुटली ठाण्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: खंडणी देण्यास नकार देणाºया बादरुद्दीन शेख (४५, रा. मुंबई) या मासळी विक्रेत्याच्या मोबाईल आणि काही रोकडची २५ ते ३० वयोगटातील दोन लुटारुंनी जबरीने चोरी केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख हे आझादनगर येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ५५ जवळील मोकळया जागेत २७ मार्च रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास मासळी विक्रीसाठी बसले होते. त्याचवेळी दोघे लुटारु त्याठिकाणी आले. त्यांच्यापैकी एकाने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. हे पैसे देण्यास त्यांनी नकार दिल्यानंतर दोघांनीही त्यांना मारहाण केली. नंतर चाकूच्या धाकावर त्यांच्याकडील तीन हजार ४०० इतकी रोकड आणि मोबाईल असा सुमारे दहा हजारांचा ऐवज त्यांच्याकडून जबरीने हिसकावला. शेख यांनी याप्रकरणी २८ मार्च रोजी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Forcible theft of a fishmonger's mobile phone for refusing to pay a ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.