बदलापूरच्या ढाब्यावरुनही विदेशी मद्य जप्त

By admin | Published: July 5, 2017 08:10 PM2017-07-05T20:10:52+5:302017-07-05T20:10:52+5:30

गावठी दारुची चोरटी वाहतूक करणाऱ्या ठाण्यातील ठाण्यातील एका महिलेला कापूरबावडी पोलिसांनी तर बदलापूरातील नामदेव पुजारे या दुचाकीस्वाराला राज्य

Foreign liquor seized at Badlapur's Dhabaab | बदलापूरच्या ढाब्यावरुनही विदेशी मद्य जप्त

बदलापूरच्या ढाब्यावरुनही विदेशी मद्य जप्त

Next

आॅनलाइन लोकमत
ठाणे, दि. 05 - गावठी दारुची चोरटी वाहतूक करणाऱ्या ठाण्यातील ठाण्यातील एका महिलेला कापूरबावडी पोलिसांनी तर बदलापूरातील नामदेव पुजारे या दुचाकीस्वाराला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. बदलापूरातील एका ढाब्यासह गावठी दारुच्या अड्डयावरही या पथकाने मंगळवारी रात्री आणि बुधवारी दुपारी कारवाई केली. यात दोघांना अटक करण्यात आली असून गावठी दारुसह एक लाख ३३ हजार २७५ रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अंबरनाथ बदलापूर भागातील ढाब्यांवरच बेकायदेशीरपणे मद्य विक्री खुलेआमपणे सुरु असल्याबाबत ‘हायवेवरील ढाब्यांवर बेकायदेशीर बार’ या मथळयाखाली ‘लोकमत’ने ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’ हे विशेष वृत्त ३ जुलै रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी तसेच अंबरनाथ येथील पथकाने आठ ढाब्यांवर कारवाई करुन आठ जणांना अटक केली. यात तिघे जण पसार झाले होते. दरम्यान, बुधवारी पुन्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक नाना पाटील, अंबरनाथचे निरीक्षक एस. आर. लाड, दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील आणि आर. ए. जाधव यांच्या पथकाने बदलापूर पश्चिम भागातील एरंजाड गावातील आई एकवीरा ढाबा येथे बेकायदेशीरपणे मद्य विक्री करणाऱ्या गिरीश मेहेर याला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. त्याच्याकडून २.५२ बल्क लीटर विदेशी मद्य जप्त करण्यात आले. तर बदलापूरच्या कर्जत रोडवरील सुभाषनगर भागात एका दुचाकीवरुन गावठी दारुची विक्री करणाऱ्या नामदेव पुंजारे (रा. मानकीवली गाव, बदलापूर) याला बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली. त्याच्याकडून त्याच्याकडून ४० लीटर गावठी दारु जप्त करण्यात आली. या दोन्ही कारवाईत ४४ हजार ७५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
तर तिसरी कारवाई बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अंबरनाथ तालुक्यातील मंगरुळ आणि ढोके गावात निरीक्षक लाड यांच्या पथकाने दोन बेवारस गावठी अड्डयांवर केली. यात ८४ हजारांचे चार हजार २०० लीटर रसायन, एक भट्टी असा ८९ हजार २०० चा चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, कापूरबावडी पोलिसांनीही चितळसर भागात गावठी दारु विक्री करणाऱ्या सीता यादव (५५) या महिलेला शाळा क्रमांक ११३ च्या परिसरातून ४ जुलै रोजी रात्री १०.४५ वा. च्या सुमारास अटक केली. तिच्याकडून दहा लीटर गावठी दारु हस्तगत करण्यात आली असून तिच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Foreign liquor seized at Badlapur's Dhabaab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.