उपवनच्या जंगलातील वणवा आटोक्यात; स्थानिकांसह वनविभागाची सतर्कता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:45 AM2020-01-14T00:45:54+5:302020-01-14T00:46:04+5:30
फांद्याच्या मदतीने विझवली आग
ठाणे : उपवन तलावाजवळील जंगलास रविवारी सायंकाळी अचानक आग लागली. या वणव्यात परिसरातील गवत मोठ्या प्रमाणात जळाले. वनाधिकाऱ्यांनी वेळीच दक्षता घेऊन या आगीला फांद्याच्या मदतीने आटोक्यात आणल्यामुळे रात्रभरात जंगल खाक होण्यापासूनचा होणारा मोठा अनर्थ सतर्कतेने टाळला.
उपवन तलावाच्या चोहोबाजूला येऊरचे जंगल असून त्यास लागून संजय गांधी राष्टÑीय उद्यान आहे. या जंगलातील वणवा वेळीच विझवण्यात यश मिळाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या जंगलास लागलेली आग ही परिसरात फिरणाºया व्यक्तींच्या निष्काळीपणातून लागल्याचा संशय आहे. या वणव्याच्या धुरांचे लोट या तलावाजवळील गावंड इमारतीमधील रहिवाशांच्या नजरेत आले. त्यांनी त्वरित महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास दूरध्वनी करून या वणव्याची माहिती दिली. त्यास अनुसरून अग्निशमन दलाची गाडी या उपवन तलावाजवळ गेली. पण, आग आतमध्ये जंगलात असल्यामुळे घटनास्थळी गाडी जाणे शक्य झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही बाब येऊरच्या वनाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिली. यानुसार, वनाधिकारी, कर्मचाºयांनी या वणव्याच्या ठिकाणी जाऊन झाडांच्या फांद्यांद्वारे लागलेली आग विझवण्यात यश मिळवल्याचे येऊर वनाधिकारी राजेंद्र पवार यांनी लोकमतला सांगितले. वनाधिकारी व कर्मचाºयांची नजर चुकवून या जंगलात शिरणाºयांकडून ही आग लागल्याचा अंदाज आहे.
संजय गांधी राष्टÑीय उद्यानास लागून असलेल्या या येऊरच्या जंगलातील मानवनिर्मित हालचालींवर वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा, या जंगलातील वणवा राष्टÑीय उद्यानात शिरून पशुपक्षी, वन्यप्राणी आणि वनसंपत्ती, औषधी वनस्पती जळून नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.