घोलाईनगरच्या तीव्र उतारावरील घरांना वनविभाग बजावणार नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:39 AM2021-07-29T04:39:23+5:302021-07-29T04:39:23+5:30
ठाणे : घोलाईनगर भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाचजणांचा मृत्यू झाल्यानंतर या भागातील घरांचा सर्व्हे वनविभागाने केला ...
ठाणे : घोलाईनगर भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाचजणांचा मृत्यू झाल्यानंतर या भागातील घरांचा सर्व्हे वनविभागाने केला असता, येथील तीव्र उतारावर २५ घरे आढळली. त्या अनुषंगाने येथील रहिवाशांना नोटिसा बजावणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. ही नोटीस बजावल्यानंतर पोलीस बंदोबस्तात येथील घरांवर कारवाई करणार असल्याचेही वनविभागाने स्पष्ट केले आहे.
१९ जुलैला झालेल्या पावसात कळव्यातील घोलाईनगर भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाचजणांचा बळी गेला होता. त्यानंतर डोंगरावरील बांधकामांची समस्या पुढे आली. पालिका आणि वनविभागात यांच्यात यावरून शाब्दिक चकमकदेखील उडाली होती. वनविभागावर टीका झाल्यानंतर तीव्र उतारावरील २५ घरांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत. या घरांना पाणी व वीज जोडणी देणाऱ्या महापालिका व महावितरणशी पत्रव्यवहार करून सुविधा खंडित करण्याबाबत कळविणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे यांनी दिली.