वानरांचे मृत्यू रोखण्यासाठी वनविभाग सरसावला; महावितरणची घेणार मदत : उपायांची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 11:02 PM2020-12-31T23:02:54+5:302020-12-31T23:02:58+5:30

उपायांची चाचपणी

The forest department stepped in to prevent the monkeys from dying; | वानरांचे मृत्यू रोखण्यासाठी वनविभाग सरसावला; महावितरणची घेणार मदत : उपायांची चाचपणी

वानरांचे मृत्यू रोखण्यासाठी वनविभाग सरसावला; महावितरणची घेणार मदत : उपायांची चाचपणी

Next

ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट, रोड नंबर २८ या परिसरात डोंगरावरून येणाऱ्या जंगली वानरांना शॉक लागण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढल्याने तो परिसर डेंजर होऊ पाहत आहे. या घटना वेळीच टाळण्यासाठी वनविभाग आता ठाणे महापालिका, महावितरण आणि वन्यजीव (प्राणी) संघटना यांची मदत घेऊन उपाययोजना करणार आहे.

वागळे इस्टेट रोड नंबर २८ हा परिसर प्रामुख्याने डोंगराजवळ असून तो संजीव गांधी राष्ट्रीय उद्यानात येतो. येथील जंगली वानरे हे अन्न आणि पाण्यासाठी या परिसरात येतात. त्यातच गेल्या महिनाभरात या ठिकाणी शॉक लागून घडलेल्या चार घटनांमध्ये नाहकपणे निष्पाप पाच वानरांचा मृत्यू झालेला आहे. त्यातील पहिल्या घटनेत दोन वानर मृत्युमुखी पडल्यावर तेथील स्थानिक लहान मुलांनी त्या दोन माकडांना जवळील डोंगरावर नेऊन त्यांना जमिनीत पुरले होते. या घटनेची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाल्यावर त्यांनी ती बाब वनविभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी वनविभागाने घटनास्थळी जाऊन त्या पुरलेल्या वानरांना बाहेर काढून त्यांचे शवविच्छेदन केले होते. त्यानंतर एकापाठोपाठ एक घटना घडू लागल्या आहेत. चौथ्या घटनेत शॉक लागून एक वानर जखमी अवस्थेत मिळून आले होते. त्याला उपचारार्थ दाखल केल्यानंतर त्याचा तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वाढत्या घटना लक्षात घेऊन वनविभागाच्या येऊर परिक्षेत्राने घटनांना आळा घालण्याबाबत ठाणे परिक्षेत्र विभागाला सांगितले.  त्यानुसार, ठाणे परिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे यांनी ज्या ठिकाणी घटना घडत आहेत, त्या ठिकाणची पाहणी करून तेथील अडचणी जाणून घेतल्या. लवकरच महापालिका आणि महावितरण विभागाची संयुक्तरीत्या वन्यजीव संघटनांची मदत घेऊन नेमक्या काय उपाययोजना करायला लागतील, याचा अभ्यास करून आवश्यक उपाययोजना तातडीने राबवणार आहेत.

Web Title: The forest department stepped in to prevent the monkeys from dying;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.