२ महिन्यांसाठी पर्यटन स्थळावर जाणे विसरा; ठाणे जिल्ह्यातील पर्यटन केंद्रांवर जमावबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 10:17 AM2024-07-04T10:17:16+5:302024-07-04T10:17:41+5:30

पर्यटकांचा हिरमोड होणार,  वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जीवितहानी होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.  

Forget going to a tourist destination for 2 months; Ban on tourist centers in Thane district | २ महिन्यांसाठी पर्यटन स्थळावर जाणे विसरा; ठाणे जिल्ह्यातील पर्यटन केंद्रांवर जमावबंदी

२ महिन्यांसाठी पर्यटन स्थळावर जाणे विसरा; ठाणे जिल्ह्यातील पर्यटन केंद्रांवर जमावबंदी

बदलापूर : बदलापूरजवळील कोंडेश्वर तसेच इतर धबधब्यांच्या परिसरात दोन महिन्यांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. धबधब्याजवळच्या एक किमी परिसरात हे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, त्यामध्ये पोहणे तसेच धबधब्यावर जाणे व पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे आदींसाठी बंदी असणार आहे. 

भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. पावसाळ्यात धबधबे, तलाव, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या तसेच धरणांच्या ठिकाणी निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी नागरिक येत असतात.  वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जीवितहानी होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. 

येथे असेल जाण्यास मनाई
कांबा, पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, गणेश घाट. मुरबाड तालुक्यातील सिद्धगड, डोंगरन्हावे, सोनाळे, हरिश्चंद्रगड, बारवी धरण परिसर, पडाळे डॅम परिसर, माळशेज घाट व घाटातील सर्व धबधबे, माळशेज घाट, गोरखगड, नानेघाट. शहापूर तालुक्यातील गणेशपुरी नदी परिसर (वज्रेश्वरी) भातसा धरण व परिसर, माहुली गड व पायथा, अशोक धबधबा, आजा पर्वत (डोळखांब), सापगांव नदीकिनारा, कळंबे नदी, कसारा येथील सर्व धबधबे, कसारा घाट या ठिकाणीही हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

Web Title: Forget going to a tourist destination for 2 months; Ban on tourist centers in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन