Coronavirus: भाजपाच्या माजी मंत्र्याला कोरोनाची लागण; मुलुंडच्या खासगी रुग्णालयात केलं दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 06:19 PM2020-06-13T18:19:58+5:302020-06-13T18:20:14+5:30

भाजपा नेते जगन्नाथ पाटील हे डोंबिवली पूवेला राहतात. ते राहत असलेल्या परिसरात कोरोनाचे जास्त रुग्ण आढळून आलेले आहेत.

Former BJP minister infected with coronavirus; Admitted to a private hospital in Mulund | Coronavirus: भाजपाच्या माजी मंत्र्याला कोरोनाची लागण; मुलुंडच्या खासगी रुग्णालयात केलं दाखल

Coronavirus: भाजपाच्या माजी मंत्र्याला कोरोनाची लागण; मुलुंडच्या खासगी रुग्णालयात केलं दाखल

Next

कल्याण - माजी मंत्री व खासदार भाजपाचे नेते जगन्नाथ पाटील यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. त्यांना उपचारासाठी मुलुंड येथील बड्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भाजपा नेते जगन्नाथ पाटील हे डोंबिवली पूवेला राहतात. ते राहत असलेल्या परिसरात कोरोनाचे जास्त रुग्ण आढळून आलेले आहेत. पाटील यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेली आहेत. त्यांना काल त्रास जाणवू लागल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली. त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यानंतर उपचारासाठी त्यांना मुलुंडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जगन्नाथ पाटील हे माजी खासदार, माजी आमदार आहेत. शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात ते मंत्री होते.

भाजपाचे जुने जाणते नेते असा त्यांचा नावलौकीक आहे. देशात कोरोनाचा प्रार्दुभाव सुरु झाल्यावर अनेकांना कोरोनाची लागण होत आहे, अशात ६० वर्षावरील लोकांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण जास्त आहे. देशाला कोरोनापासून दूर राहण्याचे आवाहन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिल रोजी पाटील यांना स्वत: फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा प्रादूर्भाव इतका वाढला की, शहरात आजमितीस १ हजार ९११ कोरोना रुग्णांची संख्या झाली. कल्याण डोंबिवली ही कोरोनाचा हॉटस्पॉट झाली. कोरोनाच्या विळख्यात सामान्य माणसासोबत सरकारी कर्मचारी अडकले. मनसेच्या पदाधिकारी राजेश कदम यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या पाठोपाठ आत्त भाजपाचे नेते पाटील यांनाही कोरोना झाल्याचं उघड झालं आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखांच्या वर पोहचला आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या ३ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली, जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण आणि अलीकडेच धनंजय मुंडे यांची कोरोनाची चाचणी पोझिटिव्ह आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात करत पुन्हा घरी परतले आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

खासगी लॅबमधील कोरोना चाचणीचे दर ५० टक्क्यांनी कमी; राज्य सरकारचा मोठा निर्णय

चिंताजनक! राज्यातील १ कोटी ६६ लाख विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहणार?

राज्य सरकारनं सत्य सांगावं, सर्वसामान्यांना त्रास होतोय; भाजपा खासदाराचा गंभीर आरोप

हिंद महासागरात वेगाने पसरतोय ड्रॅगन; येणाऱ्या काळात भारतासाठी मोठं टेन्शन!

कोरोनापाठोपाठ चीनवर कोसळलं नवं संकट; लाखो लोकांचा जीव धोक्यात तर अनेक जण बेपत्ता!

Web Title: Former BJP minister infected with coronavirus; Admitted to a private hospital in Mulund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.