ठाण्याच्या माजी महापौर शारदा राऊत यांचे निधन
By जितेंद्र कालेकर | Published: November 24, 2022 09:04 PM2022-11-24T21:04:26+5:302022-11-24T21:05:15+5:30
ठाण्याच्या माजी महापौर शारदा राऊत यांचे प्रदीर्घ आजाराने गुरूवारी निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या हाेत्या. त्यांच्या पश्चात पती प्रमाेद, दोन मुले,सूना आणि नातवंडे असा परिवार आहे.
ठाणे: ठाण्याच्या माजी महापौर शारदा राऊत यांचे प्रदीर्घ आजाराने गुरूवारी निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या हाेत्या. त्यांच्या पश्चात पती प्रमाेद, दोन मुले,सूना आणि नातवंडे असा परिवार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्या ग्रस्त होत्या. उपचारादरम्यान ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. २००२ ते २००५ या काळात त्यांनी महापाैरपद भूषविले होते. त्याआधी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले हाेते.
आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. तसेच ठाणे शहराच्या विकासाच्या बाबतीत त्यांचे मोठे योगदान हाेते. ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय आणि परबवाडी या प्रभाग क्रमांक १९ मधून शिवसेनेच्या तिकीटावर त्या निवडून आल्या हाेत्या. ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत त्यांच्यावर सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.