माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयात केले हजर
By अजित मांडके | Published: November 12, 2022 11:15 AM2022-11-12T11:15:23+5:302022-11-12T11:16:31+5:30
न्यायालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त, कार्यकर्त्यांची घोषबाजी
ठाणे : माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबवस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील मोठी गर्दी केली असून कार्यकर्त्यांची घोषणाबाजी देखील केली. खबरदारीचा उपाय म्हणून कोर्ट नाक्याकडे येणारे दोन्ही मार्ग पोलिसांनी बंद केले आहेत. दरम्यान न्यायालयाकडून काय निर्णय येतो याची वाट कार्यकर्ते पाहत आहेत.
असा घडला होता प्रकार
सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचा शो सुरू होता. या चित्रपटामध्ये शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्याविषयीच्या इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी शो बंद पाडला.
जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयात घेऊन जाताना.
— Lokmat (@lokmat) November 12, 2022
व्हिडीओ : विशाल हळदे pic.twitter.com/G6RS8oblEK
यावेळी काही प्रेक्षकांना आव्हाडांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मनसेनं यासंदर्भात टीका केल्यानंतर आव्हाडांविरोधात वर्तकनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आली.