माजी आमदार नरेंद्र मेहतांकडे भाजपत निवडणूक प्रमुखपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:45 AM2021-09-22T04:45:05+5:302021-09-22T04:45:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. २५ ...

Former MLA Narendra Mehta holds BJP election chief post | माजी आमदार नरेंद्र मेहतांकडे भाजपत निवडणूक प्रमुखपद

माजी आमदार नरेंद्र मेहतांकडे भाजपत निवडणूक प्रमुखपद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. २५ सप्टेंबरला त्यांच्या जन्मदिनापासून ते पुन्हा राजकारणात सक्रिय होणार, असे फलक त्यांच्या समर्थकांनी मीरा रोड, भाईंदरमध्ये ठिकठिकाणी लावले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीवर लक्ष ठेवून मेहतांना निवडणूक प्रमुख केले जाण्याची चर्चा आहे.

मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नगरसेविका गीता जैन यांनी अपक्ष निवडणूक लढवून मेहतांचा पराभव केला. त्यानंतर २०२० मध्ये मेहतांची एक वादग्रस्त व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली. त्यावेळी मेहतांनी भाजप व राजकारण सोडल्याचे जाहीर केले होते. भाजपच्या एका नगरसेविकेनेच मेहतांविरुद्ध लैंगिक अत्याचाराची फिर्याद दिली होती. पुढे मेहतांसह त्यांच्या सहकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला. परंतु मेहतांची स्थानिक भाजपवरील पकड कायम आहे. पक्षाच्या बैठकी, पालिकेतील बैठकी तसेच सार्वजनिक कार्यक्रमात मेहता यांची उपस्थिती चर्चेत असायची. कोरोना संसर्ग काळात व्ही फॉर यू संस्थेच्या माध्यमातून ते सक्रिय राहिले.

या काळात जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांच्याशी मेहता व समर्थकांचे बिनसले. प्रदेश नेतृत्वाने मीरा-भाईंदर भाजप जिल्हाध्यक्षपदी मेहता यांचे विरोधक मानले जाणारे ॲड. रवी व्यास यांची नियुक्ती केल्यानंतर खळबळ माजली. व्यास यांच्या नियुक्ती विरोधात मेहता समर्थक आक्रमक झाले होते. मेहता समर्थकांनी थेट प्रदेश कार्यालयात शक्तिप्रदर्शनामुळे पक्षनेतृत्वाला व्यास यांची जिल्हाध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती जाहीर करता आली नाही. आजही व्यास हे स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून वावरत नाहीत. यावरून भाजपमध्ये मेहतांचा प्रभाव कायम असल्याचे दिसते.

पुढीलवर्षी महापालिका निवडणूक असल्याने मेहतांना निवडणूक प्रमुखाचे पद भाजपकडून दिले जाण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने २५ सप्टेंबर या मेहतांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पुन्हा सक्रिय होण्याची जय्यत तयारी मेहता व समर्थकांनी चालविली आहे.

मेहतांच्या माध्यमातून शहराचे विकास पर्व २५ सप्टेंबरला परत येणार, अश्या आशयाच्या जाहिराती ठिकठिकाणी लागल्या आहेत. समाजमाध्यमांतून व्हिडिओ क्लिप, फोटो पसरविले जात आहेत.

............

वाचली

Web Title: Former MLA Narendra Mehta holds BJP election chief post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.