माजी आमदार पप्पू कलानी यांच्या खाजगी स्वीयसहायक नंदू ननावरे याची पत्नीसह आत्महत्या
By सदानंद नाईक | Published: August 1, 2023 08:23 PM2023-08-01T20:23:25+5:302023-08-01T20:24:00+5:30
मध्यवर्ती रुग्णालयात ननावरे पतीपत्नीचे शवविच्छेदन झाल्यावर, मृतदेह सातारा फलटण येथे नेण्यात आले आहे.
उल्हासनगर : माजी आमदार पप्पु कलानी व ज्योती कलानी यांचे खाजगी स्वीयसहायक नंदू ननावरे यांनीं घरगुती वादातून पहिल्या पत्नीसह घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मध्यवर्ती रुग्णालयात ननावरे पतीपत्नीचे शवविच्छेदन झाल्यावर, मृतदेह सातारा फलटण येथे नेण्यात आले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, आशेळेगाव नागराणी मंदिर मागे नंदू ननावरे हे दोन पत्नी व दोन मुलामुलीसह तीन मजल्याच्या घरात राहत होता. ननावरे यांनी माजी आमदार पप्पू कलानी व ज्योती कलानी यांचे स्वीयसहायक म्हणून काम केले असून आजच्या स्थितीत कलानी कुटुंबाचे मंत्रालयातील कामे ते करीत होते. तसेच मंत्रालयातील कामानिमित्त शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांच्याकडे जाणे येणे होते. असे बोलले जाते. मंगळवारी दुपारी अड्डीच वाजण्याच्या दरम्यान पहिली पत्नी उज्वलासह नंदू ननावरे हे घरात होते. तर दुसरी पत्नी ही मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेली होती. तर पहिल्या पत्नीची मोठी मुलगी कॉलेजला गेली होती.
नंदू ननावरे व पाहिली पत्नी उज्वला घरी एकटी असतांना दुपारी अड्डीच वाजता पत्नी उज्वला हिने घराच्या तिसऱ्या मजल्यावरून प्रथम खाली उडी मारली. यावेळी मोठा आवाज झाल्याने, शेजारील नागरिक घराबाहेर आले. त्यावेळी नागरिकांना उज्वला रक्ताच्या थारोळ्यात पडली. तर नंदू ननावरे घराच्या तिसऱ्या मजल्यावर उडी मारण्याच्या तयारीत होता. त्यावेळी नागरिकांनी खाली उडी मारू नको. अशी विनविनी केली. मात्र कोणाचेही काही एक न ऐकता नंदू ननावरे यांनीही खाली उडी मारून आत्महत्या केली. शेजारील नागरिकांना जिवंत असेल या आशेतून मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी पतीपत्नीला मृत घोषित केले. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्रतिक्रीया वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी देऊन, तपास सुरू असल्याची माहिती दिली. तर याप्रकरणी सखोल तपास करणार असल्याचे संकेत पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनीं दिली.
माझा खाजगी स्वीयसहायक नाही...आमदार बालाजी किणीकर
नंदू ननावरे यांचे माझ्या आमदार कार्यालयात येणे-जाणे होते. मात्र अधिकृतपणे खाजगी स्वीयसहायक नसल्याची प्रतिक्रिया आमदार बालाजी किणीकर यांनी दिली आहे.