उल्हासनगरात आजी-माजी आमदार कुमार आयलानी व पप्पु कलानी एकत्र, शहरात चर्चेला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 06:05 PM2021-10-08T18:05:22+5:302021-10-08T18:05:39+5:30

उल्हासनगरात थैलेसिमियाग्रस्त मुलांची संख्या २२५ असून त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी आमदार कार्यालयात एका बैठकीचे आयोजन शुक्रवारी केले.

Former MLAs Kumar Ayalani and Pappu Kalani meet in Ulhasnagar | उल्हासनगरात आजी-माजी आमदार कुमार आयलानी व पप्पु कलानी एकत्र, शहरात चर्चेला उधाण

उल्हासनगरात आजी-माजी आमदार कुमार आयलानी व पप्पु कलानी एकत्र, शहरात चर्चेला उधाण

Next

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील एकून १२५ थैलेसिमियाग्रस्त मुलांचा उपचार व त्यांच्या समस्यासाठी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले आजी-माजी आमदार कुमार आयलानी व पप्पु कलानी हे आयलानी यांच्या कार्यालयात शुक्रवारी एकत्र आल्याने, विविध चर्चेला उधाण आले. यावेळी मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे यांच्यासह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 उल्हासनगरात थैलेसिमियाग्रस्त मुलांची संख्या २२५ असून त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी आमदार कार्यालयात एका बैठकीचे आयोजन शुक्रवारी केले. बैठकीला आयलानी यांचे कट्टर राजकीय विरोधक माजी आमदार पप्पु कलानी हेही उपस्थित राहिल्याने, शहरात विविध चर्चेला उधाण आले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सोबत याबाबत बैठक करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे यांच्यासह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, थैलेसिमियाग्रस्त मुलांचे वडील आदीजन उपस्थित होते. मुलांच्या वडिलांनी थैलेसिमिया वॉर्ड अनेक वेळा बंद असून गैरसोय होत असल्याचा पाडा वाचण्यात आला. तसेच आंदोलन करण्याचा इशारा दिला. 

मध्यवर्ती रुग्णालयाचे प्रमुख डॉ सुधाकर शिंदे यांनी उपस्थितांचे सर्व आरोप फेटाळून रुग्णालयातील थैलेसिमिया वॉर्ड चांगल्या अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. मुलांना वेळेत रक्त पुरवठा केला जात असून रक्ताचा पुरेसा साठा असल्याची माहिती यावेळी शिंदे यांनी दिली. तसेच नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. आमदार कुमार आयलानी व पप्पु कलानी यांनी डॉक्टर व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, थैलेसिमियाग्रस्त मुलांच्या पालक सोबत चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. कलानी व आयलानी यानिमित्त एकत्र आल्याने, भाजप व कलानी युतीची चर्चा शहरात रंगली आहे.

 चौकट

 कलानी व आयलानी कट्टर विरोधक 

शहरात कलानी व आयलानी राजकीय कट्टर विरोधक असून त्यांच्यात नेहमी राजकीय कुरघोडी सुरू असते. सलग चार वेळा आमदार पदी निवडून आलेल्या कलानी यांचा कुमार आयलानी यांनी आमदार पदाच्या निवडणुकीत पराभूत केले होते. त्यानंतर पप्पु कलानी यांच्या धर्मपत्नी ज्योती कलानी यांनी आयलानी यांचा पराभव केला. तर गेल्यावेळी आमदार पदाच्या निवडणुकीत कुमार आयलानी यांनी ज्योती कलानी यांचा पराभव केला. भविष्यात पुन्हा आयलानी व कलानी सामना रंगणार आहे.

Web Title: Former MLAs Kumar Ayalani and Pappu Kalani meet in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.