कलानी हाती घेणार तुतारी! माजी आमदार पप्पू कलानी, ओमी कलानी शरद पवारांच्या भेटीला

By सदानंद नाईक | Published: September 23, 2024 05:41 PM2024-09-23T17:41:39+5:302024-09-23T17:42:42+5:30

महाआघाडीकडून तुतारीवर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची प्रतिक्रिया ओमी कलानी यांनी दिली.

Former MLAs Pappu Kalani, Omi Kalani, Pancham Kalani met Sharad Pawar | कलानी हाती घेणार तुतारी! माजी आमदार पप्पू कलानी, ओमी कलानी शरद पवारांच्या भेटीला

कलानी हाती घेणार तुतारी! माजी आमदार पप्पू कलानी, ओमी कलानी शरद पवारांच्या भेटीला

सदानंद नाईक, उल्हासनगर: माजी आमदार पप्पु कलानी, ओमी कलानी, पंचम कलानी यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन, विधानसभा उमेदवारांबाबत चर्चा केली. यावेळी पक्षनेते जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. महाआघाडीकडून तुतारीवर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची प्रतिक्रिया ओमी कलानी यांनी दिली.

 उल्हासनगर म्हणजे पप्पू कलानी या समीकरणाला भाजपचे कुमार आयलानी यांनी छेद दिला असलातरी. एकूणच शहरातील राजकारण कलानी कुटुंबा भोवती फिरत असल्याचे चित्र आहे. लोकसभेला कलानी कुटुंबानी दोस्ती या गोंडस नावाखाली महायुतीचे मात्र शिंदेंसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारात उतरले होते. तर इतरत्र लोकसभेत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. लोकसभा निवडणूक पार पडताच कलानी कुटुंबांनी महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावली. माजी आमदार पप्पु कलानी यांनी ३४ वर्षानंतर काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेट घेतली होती. दरम्यान रिपाइं आठवले गटातून हक्कालपट्टी झालेले जिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर भगवान भालेराव यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन तुतारीवर उभा राहणार असल्याचे सांगितल्याने गोंधळ उडाला होता. माजी आमदार पप्पु कलानी, युवानेते ओमी कलानी, माजी महापौर पंचम कलानी यांनी रविवारी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.  कलानी कुटुंबाकडून पप्पु कलानी ऐवजी ओमी कलानी निवडणूक रिंगणात उतरणार असून शरद पवार यांनी हिरवा कंदील दिल्याचे बोलले जात होते. महाविकास आघाडीकडून ओमी कलानी हे तुतारीवर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढच्या महिन्यात शरद पवार यांची सभा उल्हासनगरात ठेवण्याचे संकेतही कलानी यांनी दिले.

 कलानी गटात उत्साह
 कलानी कुटुंबानी समर्थकासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची रविवारी भेट घेतल्यानंतर, कलानी समर्थकांत उत्साहाचे चित्र आहे. त्यांनी प्रचाराचे नारळ यापूर्वीपासूनच फोडले आहे. *ठाकरे सेना व काँग्रेसचा पाठिंबा? महाविकास आघाडीकडून उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात एकमेव कलानी कुटुंबाचे नाव पुढे आहे. शहर ठाकरे गट व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कलानी यांच्या नावाला मुकसंमती दिल्याचे बोलले जात आहे. *भाजपचे आयलानी यांची कोंडी? भाजपचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांच्यासह पक्षातील ३ ते ४ जण इच्छुक आहेत. तसेच शिंदेंसेनेचे राजेंद्र चौधरी यांनीही दंड ठोठावले आहे.

 एकूणच आयलानी कोंडीत सापडले आहे.

Web Title: Former MLAs Pappu Kalani, Omi Kalani, Pancham Kalani met Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.