व्हॅलेंटाइन डे च्या मुहूर्तावर ठाण्यात ३०० विद्यार्थ्यांना किल्ले सफारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:41 AM2021-02-16T04:41:13+5:302021-02-16T04:41:13+5:30

ठाणे : ‘प्रेम करावे तर शिवाजी महाराजांच्या विचारांवर; त्यांच्या गडकिल्ल्यांवर करावे’ असा संदेश देऊन रविवारी व्हॅलेंटाइन डे चा ...

Fort safari for 300 students in Thane on the occasion of Valentine's Day | व्हॅलेंटाइन डे च्या मुहूर्तावर ठाण्यात ३०० विद्यार्थ्यांना किल्ले सफारी

व्हॅलेंटाइन डे च्या मुहूर्तावर ठाण्यात ३०० विद्यार्थ्यांना किल्ले सफारी

Next

ठाणे : ‘प्रेम करावे तर शिवाजी महाराजांच्या विचारांवर; त्यांच्या गडकिल्ल्यांवर करावे’ असा संदेश देऊन रविवारी व्हॅलेंटाइन डे चा मुहूर्त साधून ठाण्यातील ३०० विद्यार्थ्यांना ‘शिवनेरी’ किल्ल्याची सफर घडविण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या ओवळा माजिवडा विधानसभा शाखेने हा अनोखा उपक्रम आयोजिला होता. सध्या पबजी आणि सोशल मीडियाच्या युगात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्याचा इतिहास समजावा यासाठी हा उपक्रम हाती घेत शिवरायांना वंदन करून शिवजयंतीच्या एक आठवडा आधीच शिवनेरीवर भगवा ध्वज फडकावण्यात आला.

कोरोना काळात लाॅकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने शैक्षणिक सहलींना ब्रेक लागला होता. त्यातच रविवार सुट्टीचा दिवस आणि जगभर व्हॅलेंटाईन डे ची धूम सुरू असतानाच आठवडाभरावर आलेल्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मनविसेने परिसरातील ३०० हून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींना पुण्याच्या जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्याची सफर घडवली. ठाणे ते पुणे असा बस प्रवास, विद्यार्थ्यांना नाश्ता, जेवण आदी सोयी उपक्रमात मोफत पुरविण्यात आल्या. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उप शहर अध्यक्ष संदीप चव्हाण व सचिव मयूर तळेकर यांनी गेल्या महिनाभरापासून या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांची नावनोंदणी सुरू केली होती. त्यानुसार विभाग अध्यक्ष विवेक भंडारे, उपविभाग अध्यक्ष सागर वर्तक, मंदार पाष्टे, सोमनाथ भोईटे, शाखाध्यक्ष निखिल येवले, आकाश मोरे, संदीप शेळके, दीपक पोळ, प्रशांत पालव, ऋषिकेश घुले, अमोल मड्ये, विघ्नेश शेलार यांच्या टीमने विद्यार्थ्यांची वर्गवारी करून त्यांना शिवनेरीवर नेणे, या किल्ल्याची विद्यार्थी वर्गास माहिती देणे अशी व्यवस्था पाहिली.

----------------

चौकट

गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. यंदा अधिक मोठ्या प्रमाणात किल्ले सफर मोहीम हाती घेण्यात आली. पुढील वर्षी एका नव्या किल्ल्यावर विद्यार्थ्यांना नेण्यात येईल. त्यावेळी ही संख्या हजारोंच्या घरात असेल अशी माहिती यावेळी उपशहर अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली.

Web Title: Fort safari for 300 students in Thane on the occasion of Valentine's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.