अखेर वर्तकनगरच्या ४० पोलीस कुटूंबीयांवरील गडांतर टळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 10:22 PM2020-10-14T22:22:16+5:302020-10-14T22:32:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : तांत्रिकदृष्ट्या अती धोकादायकमध्ये गणल्या गेलेल्या वर्तकनगर येथील १४ आणि १६ या दोन इमारतींच्या रहिवाशांना ...

Fortress of 40 police families of Vartaknagar finally avoided! | अखेर वर्तकनगरच्या ४० पोलीस कुटूंबीयांवरील गडांतर टळले!

पोलीस आयुक्तांनी दिला हिरवा कंदील

Next
ठळक मुद्देखासदार राजन विचारे यांची मध्यस्थीपोलीस आयुक्तांनी दिला हिरवा कंदील

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: तांत्रिकदृष्ट्या अती धोकादायकमध्ये गणल्या गेलेल्या वर्तकनगर येथील १४ आणि १६ या दोन इमारतींच्या रहिवाशांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यापाठोपाठ पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनीही हिरवा कंदील दिला आहे. शिवसेना खासदार राजन विचारे यांच्यासह या रहिवाशांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर आयुक्तांनी या कारवाईला तूर्तास स्थगिती दिल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त चारुशीला पंडित यांनी म्हाडा वसाहतीमधील पोलीस निवासस्थाने असलेल्या इमारत क्रमांक १४ आणि १६ या दोन इमारतींना धोकादायक इमारतीचे तांत्रिक परिक्षण अहवाल (स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट) तसेच स्थैर्यता प्रमाणपत्र (स्टॅबिलिटी सर्टीफिकेट) सादर करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, हे कोविडमुळे हे स्थैर्यता प्रमाणपत्र वेळेत देता न आल्यामुळे इमारतीला अतिधोकादायकचा फलक लावला. ती तातडीने रिक्त करण्याची पालिकेने पोलीस प्रशासनाला नोटीसही बजावली. त्यामुळेच वर्तकनगर पोलिसांनी या इमारती अवघ्या ४८ तासांमध्येच रिक्त करण्याच्या नोटीसा बजावल्या होत्या. विशेष म्हणजे ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालानुसार इमारत सी- २ बी या प्रवर्गामध्ये (अर्थात रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे) समाविष्ट केली आहे. तरीही पालिका आणि पोलिसांच्या कारवाईच्या इशाऱ्यामुळे ही ४० कुटूंबे हवालदिल झाली होती.
दरम्यान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे या रहिवाशांनी गाºहाणे मांडल्यानंतर पालिकेने इमारतीची दुरुस्ती आणि स्थैर्यता अहवालाच्या अटीवर कारवाई थांबविली. तरीही पोलिसांकडून कारवाईचा इशारा आल्यानंतर ठाण्याचे खासदार राजन विचारे, शिवसेना विभागप्रमुख प्रशांत सातपुते आणि स्थानिक नगरसेविका विमल भोईर यांच्यासह रहिवाशांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तेंव्हा कोरोनासारखी जागतिक महामारीचा आजार, मुलांच्या आगामी वार्षिक परीक्षा आणि आगामी सण या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची कारवाई करु नये, अशी मागणी करण्यात आली. त्यास पोलीस आयुक्तांनीही सकारात्क दुजोरा दिला. त्यामुळे रहिवाशांनी खासदार राजन विचारे आणि पोलीस आयुक्तांचे आभार मानले. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनीही या रहिवाशांवरील कारवाईच्या स्थगितीसाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
* दरम्यान, बुधवारी (१४ आॅक्टोंबर) या रहिवाशांना वास्तुविशारदाने इमारतीचे स्थैर्यता प्रमाणपत्रही दिले. त्यामुळे ठाणे महापालिका प्रशासनाकडे हे प्रमाणपत्र देण्यात आल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.
* काय होती मागणी
इमारत अतिधोकादायक नसल्यामुळे पालिका आणि पोलीस प्रशासनाने कारवाई थांबवावी. दोन्ही इमारतींमध्ये कोविडचे १५ ते १६ रुग्ण बाधित आहेत. आगामी वार्षिक परीक्षा आणि कोविडचे संक्रमण या पार्श्वभूमीवर माणूसकीच्या दृष्टीने अशी कारवाई थांबविण्याची रहिवाशांची मागणी होती.

Web Title: Fortress of 40 police families of Vartaknagar finally avoided!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.