निवडणुकांसाठी मनसेची पायाभरणी, डोंबिवलीची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:23 AM2017-10-29T00:23:31+5:302017-10-29T00:23:51+5:30

मुंबई महापालिकेतील मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीचा दौरा केला.

Foundation's foundation stone, Dombivli executive board announced | निवडणुकांसाठी मनसेची पायाभरणी, डोंबिवलीची कार्यकारिणी जाहीर

निवडणुकांसाठी मनसेची पायाभरणी, डोंबिवलीची कार्यकारिणी जाहीर

googlenewsNext

कल्याण : मुंबई महापालिकेतील मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीचा दौरा केला. २०१९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा आणि केडीएमसीच्या निवडणुकांची त्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी डोंबिवलीतील पक्ष कार्यकारिणी ठाकरे यांनी जाहीर केली. मात्र, कल्याणचा निर्णय राखून ठेवला. पक्षाची कोअर कमिटी २ नोव्हेंबरला कल्याणमध्ये पदाधिकाºयांशी संवाद साधेल. त्यानंतर, कार्यकारिणी जाहीर केली जाईल, असे शनिवारी कल्याणमध्ये झालेल्या बैठकीत उघड झाले आहे.
पश्चिमेतील ‘स्प्रिंग टाइम’ येथे मनसेच्या कल्याणमधील नगरसेवक, पदाधिकारी व विभागपातळीवरील कार्यकर्त्यांशी ठाकरे यांनी चर्चा केली. या वेळी वरिष्ठ आंदोलन करताना तुम्हाला त्याची सूचना देतात का, विश्वासात घेतात का, असे प्रश्न विचारून त्यांच्याकडून काही माहिती घेतली. त्यानंतर, ठाकरे यांनी कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले आणि सचिव महेश मोरे यांच्याशी चर्चा केली. या वेळी प्रत्येक प्रभागात इच्छुक असलेल्या विभागाध्यक्षांच्या नावांची यादी पदाधिकाºयांनी ठाकरे यांना दिली आहे. या यादीवर ठाकरे यांनी निर्णय घेतला नाही. त्यासाठी पक्षाची कोअर कमिटी २ नोव्हेंबरला कल्याणमध्ये येणार आहे. त्यानंतर, आठवडाभरात कल्याणची कार्यकारिणी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कल्याण ग्रामीण व डोंबिवली विधानसभा जिल्हाध्यक्षपदी प्रकाश भोईर यांची नियुक्ती झाली आहे. भोईर हे मनसेचे नगरसेवक व महापालिकेत पक्षाचे गटनेते आहेत. महिला जिल्हाध्यक्षपदी दीपिका पेडणेकर यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा संघटकपदी राहुल कामत व हर्षद पाटील यांची नियुक्ती केली आहे. उपजिल्हा संघटकपदी माजी नगरसेवक सुदेश चुडनाईक व शरद गंभीरराव यांची नियुक्ती केली आहे. माजी नगरसेवक राजन मराठे, राहुल चितळे व प्राजक्त पोतदार यांच्यावर शहर संघटकपदाची जबाबदारी दिली आहे. डोंबिवलीच्या शहराध्यक्षपदी मनोज घरत यांना कायम ठेवले आहे. उपविभाग आणि शाखाध्यक्ष आदींच्या नियुक्त्या केलेल्या आहेत.

राज यांनी घेतले गणपतीचे दर्शन
डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिरात सकाळी ९ वाजता राज ठाकरे यांनी गणेशाचे दर्शन घेतले. या वेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.
गणेश मंदिर संस्थानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्चस्व आहे. या संस्थानाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सदस्यपदी मनसेचे मंदार हबळे निवडून आले. मंदिर संस्थानामध्ये त्यांच्या रूपाने मनसेचा चंचूप्रवेश झाला आहे. त्यामुळे ठाकरे यांचे गणेश दर्शन महत्त्वाचे मानले गेले.
ठाकरे यांच्या दोन दिवसांच्या दौºयात त्यांचा मुलगा अमितही होता. ठाकरे हे कशा प्रकारे संवाद साधतात, काय बोलतात, आयुक्तांच्या दालनात काय चर्चा होते, याचे त्याने बारीक निरीक्षण केले. मात्र, तो राज यांच्यासमोर बसला नाही. उभे राहून एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे सगळे समजून घेतले. त्याच्या उपस्थितीनेही मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहावयास मिळाला. अमित ठाकरे सोबतही काही जणांनी सेल्फी काढली.

Web Title: Foundation's foundation stone, Dombivli executive board announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.