आयआरबीचे संस्थापक डी.पी.म्हैसकर अनंतात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 07:15 AM2018-01-04T07:15:11+5:302018-01-04T07:15:19+5:30
आयआरबीचे संस्थापक कै.डी.पी.म्हैसकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी पहाटे 2 वाजून 45 मिनिटांनी येथिल पाथर्ली स्मशान भूमीमधील गॅसदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
डोंबिवली- आयआरबीचे संस्थापक कै.डी.पी.म्हैसकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी पहाटे 2 वाजून 45 मिनिटांनी येथिल पाथर्ली स्मशान भूमीमधील गॅसदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यावेळी त्यांची वीरेंद्र, जयेंद्र ही मुले, पुण्याहून आलेल्या भाची, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार रमेश पाटील, जिमखान्याचे खजिनदार मधुकर चक्रदेव, बांधकाम व्यवसायिक दीपक मेजारी, सचिव डॉ.बाहेकर, म्हैसकर कुटुंबियांचे निकटवर्तीय सी डी प्रधान, भाजपचे पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रज्ञेश प्रभुघाटे, डीएनएस बँकेचे संचालक/अध्यक्ष उदय कर्वे, गणेश मंदिर संस्थानाचे विश्वस्त अच्युत कऱ्हाडकर, हॊटेल बार असो.चे अध्यक्ष अजित शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. म्हैसकर कुटुंबियांच्यावतीने जिमखाना संचालक मंडळ 6 किंवा 7 जानेवारी रोजी शोकसभेचे आयोजन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.