भिवंडीत मोबाईल घरपोडी प्रकरणी चार आरोपींना अटक, ८ लाखांचे २९ मोबाईल केले जप्त 

By नितीन पंडित | Published: August 10, 2024 09:25 PM2024-08-10T21:25:00+5:302024-08-10T21:25:13+5:30

दिवसा फळविक्रेते रात्री चोरटे.

Four accused arrested in case of mobile theft in Bhiwandi, 29 mobile phones worth 8 lakhs seized  | भिवंडीत मोबाईल घरपोडी प्रकरणी चार आरोपींना अटक, ८ लाखांचे २९ मोबाईल केले जप्त 

भिवंडीत मोबाईल घरपोडी प्रकरणी चार आरोपींना अटक, ८ लाखांचे २९ मोबाईल केले जप्त 

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: तालुक्यातील कोनगाव येथील मोबाईल दुकानाच्या मागील भिंत फोडून केलेल्या घरफोडीतच्या गुन्ह्यातील चार आरोपींना शिताफीने अटक करून चोरीस गेलेले ८ लाख १३ हजार रुपये किमतीचे २९ मोबाईल हस्तगत करण्यात कोनगाव पोलिसांना यश मिळाले आहे अशी माहिती कोनगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल अडुरकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

२७ जुलै रोजी कोनगाव येथील एस कलेक्शन या मोबाईल दुकानाच्या मागील बाजूची भिंत फोडून आलेल्या चोरट्यांनी दुकानातील २९ मोबाईल चोरी केले होते.या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस हवालदार घोडसरे,गोरले,पाटील,पाटील,वाकसे,गायकवाड,साळुंखे, खडसरे,पाटील या पथकाने आरोपां बाबत कोणतीही माहिती नसताना भिवंडी सह कल्याण डोंबिवली आदी परिसरातील १५० सी सी टि व्ही तपासले त्यामध्ये गुन्हयातील चार चोरटे हे कोनगाव येथुन ऑटो रिक्षा व रेल्वेने  प्रवास करून पनवेल येथे गेले असल्याचे तपासात समोर आले.तेथून सर्वप्रथम इस्माइल नसरुद्दीन शेख वय २६ यास ताब्यात घेतले त्याच्या कडील तपासात इतर तीन चोरटे हे चोरीचा माल घेवुन इंदापुर,पुणे येथे पळून गेले असल्याचे समजले.त्यानंतर पोलिस पथकाने इंदापुर,पुणे येथून मोहिउद्दिन नाझिर शेख ऊर्फ मुया वय ४४,अब्दुल मजीद हसन शेख ऊर्फ मुल्ला वय ४०,इस्माईल नसीरुद्दीन शेख वय २६ या तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी चोरीचे सर्व मोबाईल नवी मुंबई येथे आपल्या बहिणीच्या घरी ठेवल्याचे आढळून आल्याने तेथून सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.

विशेष म्हणजे हे चार ही आरोपी मुळचे झारखंड येथील असून कल्याण डोंबिवली परिसरात फलविक्रेते म्हणून फिरत असत.त्या दरम्यान चोरी करण्याच्या ठिकाणची रेकी करून रात्री चोरी करीत असल्याचे तपासातून समोर आले आहे.या चार ही जणांचा पूर्वेतिहास हा चोरीचा असून या आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल अडुरकर यांनी दिली आहे.

Web Title: Four accused arrested in case of mobile theft in Bhiwandi, 29 mobile phones worth 8 lakhs seized 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.