वाहन चोरी, घरफोडी व चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 08:07 PM2023-08-16T20:07:40+5:302023-08-16T20:16:10+5:30

९ गुन्हयांची उकल, वालीव पोलिसांची कामगिरी

Four accused of vehicle theft, burglary and theft arrested | वाहन चोरी, घरफोडी व चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक

वाहन चोरी, घरफोडी व चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक

googlenewsNext

नालासोपारा (मंगेश कराळे) :- वाहन चोरी, घरफोडी व चोरी करणाऱ्या चार आरोपींना वालीवच्या गुन्हे प्रकटिकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून ४ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी बुधवारी दिली आहे. 

सातीवलीच्या समता नगर येथील राहणाऱ्यांच्या घरासमोर चोरट्याने ५ ऑगस्टला रात्री दुचाकी चोरी करून नेली होती. वालीव पोलिसांनी याप्रकरणी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषगांने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तसेच मिळालेल्या माहीतीच्या आधारे गुन्हयांचा तपास करुन आरोपी आकाश गणेश इंगळे २६), अक्रम अब्दुल हकीम चौधरी (२५), अशिष गणेश ससाणे (२३) आणि रवि राधेश्याम वर्मा (२८) यांना ताब्यात घेतले. आरोपीकडे तपास केला असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने गुन्हात अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांनी वालीव पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील ९ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचेे दागिने, दुचाकी, मोबाईल, लॅपटॉप व रोख रक्कम असा एकुण ४ लाख ४३ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णीमा चौघुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे, वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शजयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जिलानी सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळु कुटे, विनायक राऊत, अभिजीत गढरी यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे.

Web Title: Four accused of vehicle theft, burglary and theft arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.