साडेचार फूट लांब घोरपड पकडून अग्निशमन दलाने सोडली जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:46 AM2021-09-12T04:46:02+5:302021-09-12T04:46:02+5:30

भिवंडी : शुक्रवारी गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच सकाळी साडेअकराच्या सुमारास शहरातील संत नामदेव मंदिराशेजारी असलेल्या दर्पण बुक डेपो या ...

The four-and-a-half-foot-long squirrel was caught and released by firefighters into the forest | साडेचार फूट लांब घोरपड पकडून अग्निशमन दलाने सोडली जंगलात

साडेचार फूट लांब घोरपड पकडून अग्निशमन दलाने सोडली जंगलात

Next

भिवंडी : शुक्रवारी गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच सकाळी साडेअकराच्या सुमारास शहरातील संत नामदेव मंदिराशेजारी असलेल्या दर्पण बुक डेपो या दुकानाच्या गल्लीतून साडेचार फूट लांबीची घोरपड अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शिताफीने पकडून तालुक्यातील वडपा येथील जंगलामध्ये सोडली.

पाच दिवसांपूर्वी ही घोरपड महापालिकेच्या सार्वजनिक गटारात नागरिकांना आढळून आली होती. त्यामुळे स्थानिकांनी महापालिकेच्या अग्निशमन दल व ठाण्यातील एका प्राणिमित्रांच्या संघटनेला पकडण्यासाठी पाचारण केले होते. मात्र घोरपड लांबीने मोठी व चपळ असल्याने ती पकडण्यात अपयश येत होते. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन अर्धवट सोडून सर्व जण निघून गेले. घोरपड तशीच गटारात असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. शुक्रवारी सकाळी घोरपड गटारातून बाहेर आली आणि दुकानाच्या गल्लीमध्ये बसून होती. दुकानदारांनी तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना या घटनेची माहिती दिली. त्यांनतर पुन्हा जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन घोरपडीस मोठ्या शिताफीने पकडून कापडाच्या गोणीमध्ये बंद केले. घोरपडीने आपले शरीर फुगवून शेपटीचा मारा जोरात जवानांवर केला. मात्र त्यांनी तो यशस्वीरीत्या चुकवत घोरपडीस पकडून तिला भिवंडी-नाशिक महामार्गावरील वडपा गाव जंगलात सोडले. अग्निशमन दलाचे जवान राजू कासारे, बापू गुरव, आसाराम आघाव, देविदास वाघ, हरिश्चंद्र साबरे यांनी ही कामगिरी पार पाडली.

..........

वाचली

Web Title: The four-and-a-half-foot-long squirrel was caught and released by firefighters into the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.