ठाण्यात चरसची तस्करी करणारी चौकडी जेरबंद : १८ लाखांचे चरस हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 08:34 PM2018-03-22T20:34:39+5:302018-03-22T20:34:39+5:30
ठाणे रेल्वेस्थानक परिसरात चरसच्या तस्करीसाठी दोघेजण येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे काश्मीरच्या महमंद मकबूल भटसह चौघांना ठाणे पोलिसांनी पकडले.
ठाणे : चरसची तस्करी करणाऱ्या ईश्वरचंद अग्रवाल (५३, रा. दिल्ली), महमंद मकबूल भट (६७, रा. पुलमावा, जम्मू-काश्मीर), मोहसीन खान (३३, रा. कल्याण) आणि महंमद हारुण शेख (३६, रा. कल्याण) या चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्यांच्याकडून १८ लाख २० हजारांचे नऊ किलो १०० ग्रॅम चरस हस्तगत केले आहे.
ठाणे रेल्वेस्थानक परिसरात चरसच्या तस्करीसाठी दोघे जण येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांना मिळाली होती. तिच्या आधारे अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि सहायक पोलीस आयुक्त (प्रतिबंधक) बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गोडसे, उपनिरीक्षक अमृता चवरे यांच्या पथकाने बुधवारी (२१ मार्च रोजी) रात्री ठाण्याच्या सिडको बसथांब्याच्या परिसरात सापळा लावला होता. खबºयाच्या माहितीनुसार त्याठिकाणी आलेल्या ईश्वरचंद अग्रवाल आणि महंमद मकबूल भट या दोघांना त्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नऊ किलो १०० ग्रॅम चरसही हस्तगत केले. चरसच्या खरेदीसाठी आलेल्या मोहसीन खान आणि महमंद हारुण शेख या अन्य दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
आंतरराष्टÑीय बाजारपेठेत या चरसची करोडोंच्या घरात किंमत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बेकायदेशीरपणे चरसची विक्री केल्याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटेच्या सुमारास या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुताराच्या कामातून चरसची तस्करी
महंमद मकबूल भट हा मूळचा काश्मीरचा असला, तरी तो गेल्या १० वर्षांपासून दिल्लीत वास्तव्याला आहे. तो सुताराचे काम करताकरता नकळत चरस तस्करीचाही ‘उद्योग’ करू लागला. त्याने काश्मीरमधून अग्रवालच्या मदतीने हे चरस ठाण्यात आणले. त्याने याआधीही नाशिकमध्ये चरसची तस्करी केल्याची माहिती उघड झाली आहे. प्रतिकिलो दोन लाख रुपये दराने त्याची ते कल्याणच्या दोघांना विक्री करणार होते, त्याच वेळी ठाणे पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.
ऋङ्म४१ ँं२ँ्र२ँ २े४ॅॅ’ी१२ ं११ी२३ी ्रिल्ल ळँंल्ली: १ि४ॅ ६ङ्म१३ँ १४स्रीी२ 18 ’ं‘ँ२ २ी्र९ी ि