ठाण्यात तलवारीने खुनी हल्ला करणाऱ्या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:10+5:302021-06-18T04:28:10+5:30

ठाणे : रामनगर येथील रहिवासी जोयेब शब्बीर सय्यद (३२) याच्यावर तलवारीने खुनी हल्ला करणाऱ्या आकाश भालेराव (२६), आकाश शेलार ...

Four arrested for stabbing to death in Thane | ठाण्यात तलवारीने खुनी हल्ला करणाऱ्या चौघांना अटक

ठाण्यात तलवारीने खुनी हल्ला करणाऱ्या चौघांना अटक

Next

ठाणे : रामनगर येथील रहिवासी जोयेब शब्बीर सय्यद (३२) याच्यावर तलवारीने खुनी हल्ला करणाऱ्या आकाश भालेराव (२६), आकाश शेलार (२८), सूरज हजारे (२४) आणि विवेक शर्मा (२४) या चौघांना वागळे इस्टेट पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून हल्ल्यासाठी वापरलेली तलवार ही जप्त करण्यात आली आहे.

वागळे इस्टेट भागात राहणाऱ्या जोयेब याच्यावर १३ जून रोजी रात्री १०.३० ते ११.३० वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला होता. जोयेब हा वागळे इस्टेट, कोंडवाडा रोड याठिकाणी त्याचा मित्र जावेद शेख याच्यासमवेत गप्पा मारीत उभा होता. त्याचवेळी आकाश भालेराव उर्फ वाडी आणि सूर्या हजारे हे दोघे तिथे आले. त्यांनी जोयेब याच्याकडे पाहत मुन्नाभाई खान आणि शिवा ठाकूर यांना शिवीगाळ केली. त्यावेळी जोयेबने त्यांना शिवीगाळ करु नकोस, असे बजावले. यातूनच बाचाबाची झाल्याने त्यांनी जोयेबला मारहाण केली. त्यानंतर त्याने त्याच्या इतर दोन मित्रांना ही तिथे बोलावून घेतले. तिथे आलेल्या त्याच्या मित्रांनी आणलेल्या तलवारीने भालेराव याने जोयेबच्या कान आणि डोक्यावर वार केले. इतरांनी लोखंडी रॉडने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर या टोळक्याने तिथून पलायन केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले आणि पोलीस निरीक्षक एम. व्ही. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए. बी. जाधव यांच्या पथकाने भालेराव, शेलार आणि हजारे या तिघांना १४ जून रोजी अटक केली. या तिघांनाही १९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. विवेक शर्मा याला बुधवारी (१६ जून रोजी) अटक केली असून, त्याला २३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Four arrested for stabbing to death in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.