भिवंडीत चार बंगलादेशी नागरिकांना अटक

By नितीन पंडित | Published: March 21, 2023 04:39 PM2023-03-21T16:39:53+5:302023-03-21T16:40:05+5:30

आरोपींपैकी बुरहान अब्दुल खान याच्या जवळ बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड सापडले असल्याची माहिती भोईवाडा पोलिसांनी दिली आहे.

Four Bangladeshi nationals arrested in Bhiwandi | भिवंडीत चार बंगलादेशी नागरिकांना अटक

भिवंडीत चार बंगलादेशी नागरिकांना अटक

googlenewsNext

भिवंडी: चोरट्या मार्गाने विनापरवाना भिवंडी शहरात आलेल्या चार बांगलादेशी नागरिकांची भोईवाडा पोलिसांनी सोमवारी धरपकड केली आहे.इब्राहिम अब्दुल खान वय २९,बुरहान अब्दुल खान वय २३, मोहम्मद अरफान मोहम्मद रफीकउल शेख वय १९ व मोहम्मद सोहेल मोहम्मद शेख वय २७ अशी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत.

भोईवाडा पोलीस ठाण्यातील गौरी पाडा येथील गायकर बिल्डिंग या ठिकाणी हे चारही बांगलादेशी नागरीक स्वतःची ओळख लपून पाच वर्षांपासून कोणताही परवाना न घेता अनधिकृत मार्गाने भिवंडीत वास्तव्यास राहून मजुरी करीत होते.या बांगलादेशी नागरिकांची माहिती एका गुप्त बातमीदारांमार्फत भोईवाडा पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी या चारही बांगलादेशींना अटक केली आहे.आरोपींपैकी बुरहान अब्दुल खान याच्या जवळ बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड सापडले असल्याची माहिती भोईवाडा पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Four Bangladeshi nationals arrested in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.