निवडणुकीसाठी चौथ्या दिवसांपर्यंत ठाणेसाठी चार तर कल्याणला नऊ उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 08:10 PM2019-04-05T20:10:27+5:302019-04-05T20:18:26+5:30
ठाणे मतदार संघात तीन उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली. आतापर्यंत या मतदारसंघात चार उमेदवारी अर्ज आले आहेत. याप्रमाणेच कल्याण लोकसभा मतदार संघासाठी देखील आज सात अर्ज आले असून आतापर्यंत या मतदार संघात नऊ उमेदवारी अर्ज आले.ठाणे व कल्याण मतदार संघाप्रमाणे मात्र भिवंडी मतदार संघात आज एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. या मतदार संघात आजपर्यंत एकच अर्ज आलेला आहे.
ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या चौथ्या दिवशी ठाणे मतदार संघात तीन उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली. आतापर्यंत या मतदारसंघात चार उमेदवारी अर्ज आले आहेत. याप्रमाणेच कल्याण लोकसभा मतदार संघासाठी देखील आज सात अर्ज आले असून आतापर्यंत या मतदार संघात नऊ उमेदवारी अर्ज आले आहेत.
ठाणे व कल्याण मतदार संघाप्रमाणे मात्र भिवंडी मतदार संघात आज एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. या मतदार संघात आजपर्यंत एकच अर्ज आलेला आहे. चर्चेतील वंचित बहुजन आघाडीतर्फे कोपरखैरणे येथील मल्लिकार्जुन पुजारी यांनी ठाणे मतदार संघातून आज उमेदवारी दाखल केली. त्यांचे चौथी उत्तीर्ण शिक्षण झाले आहे. याप्रमाणेच सुधारक शिंदे, माधवीलता मौर्य या अपक्ष उमेदवारांनी देखील आज ठाणे मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल केली आहे. याप्रमाणेच कल्याण मतदारसंघातून बहुजन महापार्टीतर्फे मोहम्मद खान,तर इंडियन युनियन मुस्लिम लीगतर्फे मुनिर अन्सारी यांनी उमेदवारी दाखल केली. याप्रमाणेच या मतदारसंघातू सुरेशकुमार पाल, अजयशाम मौर्या, देवेंद्र सिंग, शिवा अय्यर आणि दिनकर पालके या अपक्ष उमेदवारांनी आज उमेदवारी दाखल केली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक आठवडा मुदत देण्यात आली आहे. यातील आजचा चौथ दिवसही संपला आहे. उर्वरित चार दिवस शिल्लक आहेत. यातील शनिवारी व रविवार हे दोन दिवस सुटीचे वगळता आता उर्वरित दोन दिवसांच्या उमेदवारी अर्ज मोठ्याप्रमाणात दाखल होण्याची शक्यता आहे. या कालावधीत जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघात प्रमुख पक्षांचे उमेदवार उमेदवारी दाखल करणार आहेत. सोमवारी गौरी तृतिया आणि मंगळवार या शेवटच्या दिवशी विनायक चतुर्थी आणि अंगारक योग आहे. या दोन दिवसांच्या शुभ मुहूर्तावर प्रमुख पक्षांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहे.