ठाणेकरांच्या सेवेत चार कार्डिअॅक रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:52 AM2018-04-19T01:52:01+5:302018-04-19T01:52:01+5:30
ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने अतिशय माफक दरात या रुग्णवाहिका ठाणेकरांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
ठाणे : आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि सर्व वैद्यकीय सेवासुविधांनी सुसज्ज चार कार्डिअॅक रुग्णवाहिका महापालिकेच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने अतिशय माफक दरात या रुग्णवाहिका ठाणेकरांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
गंभीर परिस्थितीत रु ग्णाला कमीतकमी वेळेत चांगले उपचार मिळाल्यास जीवनदान मिळू शकते. शिवाय, दर्जेदार रु ग्णसेवा लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी अद्ययावत रु ग्णवाहिकांची साखळी असणे गरजेचे आहे. याच उद्देशाने ठाणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महापालिकेने ही कार्डिअॅक रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे. घर ते रु ग्णालय तसेच एका रुग्णालयापासून दुसऱ्या रुग्णालयापर्यंत या कार्डिअॅक रु ग्णवाहिका ठाणे महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध असतील. गरोदर महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा मोफत मिळणार असून रु ग्णाची नेआण करण्यासाठी प्रतिकिलोमीटर २० रु पये एवढ्या माफक दरात ही सेवा उपलब्ध असेल.
कार्डिअॅक रु ग्णवाहिकेची सेवा २४ तास नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहे. एमएच ०४ ईपी २३० आणि एमएच ०४ ईपी २३१ ही रु ग्णवाहिका कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात सकाळी ७ वाजल्यापासून सेवेत हजर असेल.
भ्रमणध्वनीवर उपलब्ध
एमएच ०४ ईपी ५०९ ही रु ग्णवाहिका लोकमान्य टिळक रु ग्णालय (कोरस) येथे सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत दोन सत्रांमध्ये उपलब्ध राहील. याशिवाय, एमएच ०४ ईपी ३७३ ही रु ग्णवाहिका अग्निशमन दल मुंब्रा पोलीस स्टेशन येथे सकाळी ७ वाजल्यापासून सेवेत उपलब्ध असेल. यासाठी नागरिक ७०४५९९९७१५ या भ्रमणध्वनी क्र मांकावर संपर्क साधावा.