संतत धार पावसात विजेच्या धक्क्याने चार शेळ्या जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 06:29 PM2020-08-20T18:29:49+5:302020-08-20T18:29:59+5:30
शेळ्या गावाशेजारील जंगलात चारण्यासाठी मंगळवारी सोडल्या होत्या.
- सुरेश लोखंडे
ठाणे: विद्युत पुरवठा करणारी मुख्य वीज वाहक तारेचा शाँक लागून बल्याणी ता. कल्याण येथील अनिता मांजे, या आदिवासी महिलेच्या चार शेळ्या जागीच ठार झाल्या. या घटनेचा पंचनामा टिटवाला पोलिसांनी केला असून या शेळ्यांचे शवविच्छेदन ही करण्यात आले आहे. या पुढील कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे.
महावितरणच्या कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे बल्याणी येथील कातकरी समाजाचे अनिता बबन मांजे यांच्या २५ शेळ्यांपैकी चार शेळ्या विजेचा धक्का लागून जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी घडली आहे. या शेळ्या गावाशेजारील जंगलात चारण्यासाठी मंगळवारी सोडल्या होत्या. या शेळ्यांवर लक्ष ठेवायला अनिता यांच्या बहिणीचा मुलगा सिताराम वाघे हा होता. दरम्यान या शेळ्या ऐका मागे एक जात आसतांना निकृष्ठ दर्जेच्या निकामी झालेल्या विजेच्या पोलवरील तुटलेल्या विद्युत वाहक तारच्या विजेचा शाँक लागून या चार शेळ्या जागीच तडफडून मेल्या. संतत धार सुरु असलेल्या पावसा दरम्यान घडलेल्या या दुर्देवी घटनेतून सुदैवाने या शेळ्या चारणारा सीताराम बचावला आहे.
विजेच्या तारेला चिकटलेल्या या तडफडणार्या शेळ्या काढण्या चा प्रयत्न करणारा सीतारामही लांब फेकला गेला आणि सुदैवाने तो बचावला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र या खरीब आदिवासी महिलेच्या शेळ्या मेल्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. या वीज पुरवठा दुर्घटनेतील अक्षम्य निष्काळजी दुर्लक्ष करणार्या संबधित महावितरणच्या आधिकारी, कर्मचार्यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस राजेश चन्ने, विष्णू वाघे यांनी लावून धरली आहे. दरम्यान या जागीच ठार झालेल्या शेळ्यांचा पोलीस पंचनामा करण्यात आला. त्यानंतर पशू वैद्यकीय आधिकारी डॉ. धनंजय मदाळे यांनी जागेवर येऊन शेळ्यांचे पोस्टमार्टम केले, या पोस्टमार्टमचा अहवालाची प्रतिक्षा करण्यात येत आहे. त्यानंतर या मेलेल्या शेळ्यांच्या नुकसान भरपाईसाठी महावितरणच्या कार्यालयाकडे पाठपुरावा करावा लागणार असल्याचे राजेश चन्ने यांनी लोकमतला सांगितले.
कल्याण तालुक्यातील बल्याणी - मोहिली दरम्यानच्या जंगलात मंगळवारी जोरदार पावसा दरम्यान पोजेच्या पोलवरील तार तुटली. वीज प्रवाह असलेल्या या तारे च्या वाजेचा धक्का लागून सहा वर्षांच्या दोन शेळ्या व सुमारे एक ते दीड वर्षाचे दोन बच्चे मेले. त्यांचे शवविच्छेदन केले असून अहवाल यायचा बाकी आहे. - डाँ. धनंजय मदाळे, पशुवैद्यकीय अधिकारी, कल्याण पंचायत समिती.