ठाण्यातून चौघे सराईत सोनसाखळी चोरटे जेरबंद: चोरीसह आठ गुन्हयांची उकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 11:53 PM2020-12-07T23:53:30+5:302020-12-08T00:02:55+5:30

चोरी, घरफोडी तसेच जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या ऋतिक सिताफराव आणि प्रतीक सिताफराव या दोन भावांसह चौघांना नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सोमवारी दिली. त्यांच्याकडून ८८ ग्रॅम सोन्याचे दागिने, तीन मोटारसायकली आणि ११ हजारांची रोकड असा चार लाख ४५ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

Four gold chain snatcher arrested from Thane: Eight cases including theft solved | ठाण्यातून चौघे सराईत सोनसाखळी चोरटे जेरबंद: चोरीसह आठ गुन्हयांची उकल

आरोपींमध्ये दोन भावांचाही समावेश

Next
ठळक मुद्दे नौपाडा पोलिसांची कारवाई आरोपींमध्ये दोन भावांचाही समावेश चार लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : चोरी, घरफोडी तसेच जबरीने सोनसाखळी चोरणाºया ऋतिक सिताफराव उर्फ भाई (१९, रा. कोपरी, ठाणे), प्रतीक सिताफराव उर्फ भावडया (२१, रा. कोपरी, ठाणे), वैभव प्रकाश गवळी उर्फ बच्ची (२६, रा. अंबरनाथ) आणि राकेश प्रेमचंद गुरु दासानी उर्फ राक्या (२६, रा. कशेळी, भिवंडी) या चौघांना नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती ठाण्याच्या परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सोमवारी दिली. त्यांच्याकडून आठ गुन्हयांमधील चार लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नौपाडा परिसरामध्ये लॉकडाऊनच्या काळात एक सोनसाखळी जबरी चोरीची घटना घडली होती. अनलॉकनंतरही दोन जबरी चोरीच्या घटना नोंद झाल्या. या घटनांचा तपास करण्याचे तसेच अशा गुन्हयांवर नियंत्रण आणण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्हयांचा तपास सुरु होता. त्याचवेळी सोनसाखळी जबरी चोरीतील दोघेजण ठाण्याच्या ब्रम्हांड भागात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ३० नोव्हेंबर रोजी ठाण्याच्या ब्रम्हांड भागातून ऋतिक आणि प्रतिक या दोघांना उपनिरीक्षक विनोद लभडे, पोलीस हवालदार महेश भोसले, पोलीस नाईक सुनिल राठोड, संजय चव्हाण, विलास चडचणकर, हरिष तावडे, प्रशांत निकुंभ, भागवत थविल, गोविंद पाटील आणि गोरखनाथ राठोड आदींच्या पथकाने अटक केली. त्यांच्या चौकशीतून त्यांचा तिसरा साथीदार वैभव यालाही त्याचदिवशी ताब्यात घेतले. त्यापाठोपाठ राकेशला १ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. सखोल चौकशीमध्ये त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात तीन ठिकाणी चोरी, सोनसाखळी जबरी चोरीच्या तीन आणि एका ठिकाणी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याचबरोबर त्यांनी नौपाडा आणिर विरार पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातही मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून आतापर्यंत आठ गुन्हे उघड झाले आहेत. त्यांच्याकडून ८८ ग्रॅम सोन्याचे दागिने, तीन मोटारसायकली आणि ११ हजारांची रोकड असा चार लाख ४५ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्यांना ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांनी आणखी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का? याचाही शोध घेण्यात येत असल्याचे उपायुक्त अंबुरे यांनी सांगितले.

Web Title: Four gold chain snatcher arrested from Thane: Eight cases including theft solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.