ऐन दिवाळीत भिवंडीत आगीच्या चार घटना; अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण
By नितीन पंडित | Published: October 25, 2022 06:40 PM2022-10-25T18:40:17+5:302022-10-25T18:41:14+5:30
अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी या दोन्ही आगीनवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
भिवंडी - भिवंडीत आगीच्या घटना वारंवार घडत असतानाच एन दिवाळी सणात शहर तसेच ग्रामीण भागात आगीच्या चार घटना सोमवारी रात्री घडल्या आहेत. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी या दोन्ही आगीनवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
शहरातील कनेरी परिसरात असलेल्या एका भंगार गोदामाला ही आग लागली होती त्याचबरोबर शेलार ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या दुसऱ्या एका भंगार गोदामाला आग लागली होती.त्यांनतर भंडारी कंपाऊंड येथील ७२ गाला परिसरात एका दुकानाला देखील मोठी आग लागली होती. त्यानंतर चौथ्या घटनेत भिवंडी बाजारपेठेतील संतोषी माता मंदिरा समोरील गल्लीतील एका दुकानाच्या छपराला पहाटे पावणे चार च्या सुमारास मोठी आग लागल्याची घटना घडली होती. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी या चारही आगीनवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून या चारही घटनांमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नसल्याची माहिती भिवंडी अग्निशमन दलाकडून मिळाली आहे.