कोपरी रेल्वे पुलावरील चार लेन अखेर सुरु; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 05:42 PM2021-10-09T17:42:16+5:302021-10-09T17:42:36+5:30

शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास यातील दोन - दोन अशा चार मार्गीका सुरु करण्यात आल्या आहेत.

Four lanes on the corner railway bridge finally started; Dedication was done by minister Eknath Shinde | कोपरी रेल्वे पुलावरील चार लेन अखेर सुरु; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले लोकार्पण

कोपरी रेल्वे पुलावरील चार लेन अखेर सुरु; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले लोकार्पण

Next

ठाणे  : ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूकीसाठी महत्त्वाच्या असलेला कोपरी रेल्वे पूलाच्या अतिरिक्त मार्गिका अखेर शनिवारी ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरु करण्यात आल्या. त्यामुळे आता या भागात होणारी वाहतुक कोंडी फुटणार आहे. तर उर्वरीत मार्गिका या वर्षभराच्या आत सुरु केल्या जातील असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पूलाच्या सदोष कामांमुळे या मार्गिकांचे परिक्षण आयआयटीकडून करण्यात येत होते. त्यामुळे मार्गिकाचे उद्घाटन लांबले होते. एमएमआरडीएकडे आयआयटीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता या नव्या मार्गिका खुल्या करण्यात आल्या आहेत.

शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास यातील दोन - दोन अशा चार मार्गीका सुरु करण्यात आल्या आहेत. पूर्व द्रुतगती महामार्गावरून दिवसाला हजारो वाहने मुंबई-ठाण्याच्या दिशेने ये-जा करत असतात. या मार्गिकेवरील कोपरी रेल्वे पूल हा अत्यंत अरु ंद असल्याने दररोज सकाळी आणि रात्नीच्या वेळेत पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना सहन करावा लागतो. तसेच मुंबई आयआयटीनेही हा पूल जुना झाल्याने पूलाची दुरूस्ती करण्याची सूचना केली होती. त्यानुसार, २०१८ मध्ये या मार्गावर पूलाची उभारणी तसेच अतिरिक्त मार्गिका तयार करण्याचे काम एमएमआरडीए आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. मध्य रेल्वेकडून रेल्वे रूळांवरील भागाची बांधणी केली जात आहे. तर, एमएमआरडीएकडून पोहोच रस्त्याचे काम केले जात आहे.

जून महिन्यात येथील ठाण्याच्या दिशेने येणारी आणि मुंबईच्या दिशेने जाणारी अतिरिक्त मार्गिका उभारण्यात आलेली आहे. त्याचवेळी या पूलाच्या उद्घाटनाची तयारीही शिवसेनेने केली होती. असे असताना एकही वाहन धावले नसताना या पूलावर तडे गेल्याचे तसेच रस्ता असमान झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर मुंबई आयआयटीने या पूलाचे परिक्षण करण्यास सुरूवात केली होती. जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत येथील वाहतूक सोडणो शक्य होणार नव्हते. त्यानंतर आयआयटीने एमएमआरडीएला पूलावर काही दुरूस्ती करण्याच्या सूचना केल्या होत्या. या दुरूस्त्या केल्यानंतर चार दिवसांपूर्वी आयआयटीने एक प्राथमिक अहवाल एमएमआरडीएला सादर केला आहे. या अहवालानंतर आता एमएमआरडीएने कोपरी पुलाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे, महापौर नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, स्थायी समिती सभापती संजय भोईर आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या उड्डाणपुलामुळे लाखो वाहनांना फायदा होणार आहे. त्यानुसार 8 पैकी दोन - दोन अशा चार लेन सुरु करण्यात आल्या आहेत. नाशिक, मुंबई, जेएनपीटीकडे जाणा:या वाहनांसाठी याचा फायदा होणार आहे. उर्वरीत मधल्या चार लेनचे काम रेल्वे आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरु होणार असून ते काम वर्षभराच्या आत पूर्ण केले जाईल. यासाठी लागणारे गर्डर देखील आलेले आहेत, त्यानुसार हे काम लवकरच सुरु होऊन ते पूर्ण केले जाईल. या पुलाच्या कामात कोणताही तांत्रिक मुद्दा राहिलेला नाही. सर्व सोपास्कार पूर्ण करुन येथील चार लेन खुल्या करण्यात आलेल्या आहेत. (एकनाथ शिंदे - पालकमंत्री - ठाणे जिल्हा)

आता जुन्या पुलाचे शिवधनुष्य

या पूलाच्या बांधकामाचे कंत्नाट एमएमआरडीएने रेलकॉन या कंपनीला दिलेले आहे. अतिरिक्त मार्गिका वाहतूकीसाठी सुरू झाल्यानंतर मुख्य मार्गिका म्हणजेच, जुन्या पूलाचे काम एमएमआरडीए आणि रेल्वेकडून केले जाणार आहे. जुन्या पुलाचे बांधकाम नऊ महिन्यांत पूर्ण होणार असल्याची घोषणा पालकमंत्नी एकनाथ शिंदे यांनी केली होती. या घोषणोस आता दोन महिने उलटले आहेत. असे असले तरी या कामास आता एक वर्ष जाईल असे सांगण्यात आले आहे.

Web Title: Four lanes on the corner railway bridge finally started; Dedication was done by minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.