भाईंदर वरून चार नवे बस मार्ग सुरू करण्यात यावे, शिवसेना गटनेत्या निलम ढवण यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 06:24 PM2021-08-19T18:24:04+5:302021-08-19T18:25:45+5:30

भाईंदर पूर्व भागात लोकवस्ती मोठी आहे. परंतु इंद्रलोक, न्यू गोल्डन नेस्ट आदी भागातील नागरिकांना कोणतीच बससेवा नसल्याने त्यांना रिक्षा शिवाय पर्याय नाही.

Four new bus routes should be started from Bhayander, demanded Shiv Sena group leader Nilam Dhawan | भाईंदर वरून चार नवे बस मार्ग सुरू करण्यात यावे, शिवसेना गटनेत्या निलम ढवण यांची मागणी

भाईंदर वरून चार नवे बस मार्ग सुरू करण्यात यावे, शिवसेना गटनेत्या निलम ढवण यांची मागणी

googlenewsNext

मीरारोड - प्रवाशांची मोठी संख्या व गरज पाहता भाईंदर पूर्ववरून अंतर्गत रिंगरूट तसेच दादर, ठाणे व अंधेरीपर्यंतच्या चार वेगवेगळ्या मीरा भाईंदर परिवहन सेवेच्या बससेवा सुरू करण्याची मागणी शिवसेना गटनेत्या निलम ढवण यांनी केली आहे. 

भाईंदर पूर्व भागात लोकवस्ती मोठी आहे. परंतु इंद्रलोक, न्यू गोल्डन नेस्ट आदी भागातील नागरिकांना कोणतीच बससेवा नसल्याने त्यांना रिक्षा शिवाय पर्याय नाही. त्यामुळे भाईंदर रेल्वे स्थानक पूर्व येथून बाळाराम पाटील मार्ग, गोडदेव, फाटक मार्ग, सावरकर चौक, न्यू गोल्डन नेस्ट,  इंद्रलोक,  विमल डेरी,  नवघर नाका ते भाईंदर स्थानक पूर्व, अशी रिंगरुट सेवा सुरू करावी जेणे करून नागरिकांना त्याचा उपयोग होईल. 

याशिवाय भाईंदर पूर्व रेल्वे स्थानक ते ठाणे, दादर तसेच महिलांसाठी अंधेरी स्थानक, असे बस मार्ग सुरू करावे जेणे करून प्रवाशांना त्यांच्या कामकाजानिमित्त ये जा करण्यासाठी सुविधा होईल, असे ढवण म्हणाल्या. परिवहन सभापती दिलीप जैन व अतिरिक्त आयुक्त डॉ संभाजी पानपट्टे याना त्यांनी तसे निवेदन दिले आहे. 
 

Web Title: Four new bus routes should be started from Bhayander, demanded Shiv Sena group leader Nilam Dhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.