Video : भिवंडीत इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 06:01 AM2019-08-24T06:01:15+5:302019-08-24T10:21:02+5:30

आतापर्यंत चार जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. तर अजून काही जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे. 

A four-storey building collapsed in Shanti Nagar area of Bhiwandi. 4 people have been rescued and several feared trapped | Video : भिवंडीत इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

Video : भिवंडीत इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

googlenewsNext

भिवंडी : येथील शांतीनगर परिसरातील एक चार मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चार जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तर दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत अजून आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शांतीनगर भागात पिरानीपाडा येथील सिटी लाईट्स हॉटेलच्या मागे, मतलो सरदार ऑफीस जवळ असलेली इमारात रात्री उशिरा अडीच वाजताच्या सुमारास कोसळली. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, अग्नीशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत चार जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. तर दोघांचा मृत्यू झाला असून काही जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे. 

धोकादायक असल्यामुळे आम्ही संपूर्ण इमारत खाली केली होती. मात्र, काही लोक परवानगीशिवाय या इमारतीत राहत होते. या दुर्घटनेत चार जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, एकाचा मृत्यू झाला आहे. ही इमारत आठ वर्षे जुनी आणि बेकायदेशीर होती, असे भिंवडी-निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अशोक रणखांब यांनी सांगितले. 

दरम्यान, याआधी मुंबईतील डोंगरी भागात असलेली केसरबाई इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील 14 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेदरम्यान ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठ्या समस्येचा सामना करावा लागला होता. यावेळी 23 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. 

 

Web Title: A four-storey building collapsed in Shanti Nagar area of Bhiwandi. 4 people have been rescued and several feared trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.