तलावातून काढला चार टन कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:58 PM2019-06-05T23:58:59+5:302019-06-05T23:59:05+5:30
ठाणे युनायटेड : तरूणांच्या सहभागातून केले श्रमदान, तलाव केला स्वच्छ
ठाणे : तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी एकीकडे ठाणे महापालिकेने पावले उचलली असताना दुसरीकडे शहरातील तरुणांनीसुद्धा आता तलाव स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यानुसार, बुधवारी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कासारवडवली येथील तलावाचे संवर्धन करण्याची मोहीम आखण्यात आली होती. विहंग सरनाईक यांच्या ठाणे युनायटेड या संस्थेच्या पुढाकाराने व स्थानिक नागरिक, तरुणांच्या सहभागाने कासारवडवली तलाव श्रमदान करून स्वच्छ करण्यात आला. या तलावातून चार टन कचरा यावेळी काढण्यात आला. यापुढे दररविवारी तलाव स्वच्छता मोहीम सुरू ठेवणार असल्याचे सरनाईक यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.
कासारवडवली येथील तलावाची स्थिती चांगली व्हावी, या तलावाचे संवर्धन व्हावे म्हणून सरोवरम ही तलावसंवर्धन मोहीम राबवणार असल्याचे जाहीर केले होते. त्याला बीच वॉरियर्स या तरु णांच्या ग्रुपने पाठिंबा दिला. अडीचशेहून अधिक लोक या तलाव स्वच्छता मोहिमेत बुधवारी सहभागी झाले होते. सकाळी ८ ते १० यावेळेत तरु णांनी श्रमदान सुरू केले. या तलावात सर्वात जास्त प्लास्टिक मिळून आले. पूजेसाठी वापरली जाणारी मडकी, पूजेचे साहित्य, विसर्जि कोणतीही मशिनरी न वापरता श्रमदान करून ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी या मोहिमेचे आयोजक विहंग सरनाईक यांनी सांगितले की, ठाण्याची ओळख तलावाचे शहर ही असून ती कायम राहिली पाहिजे. तलाव चांगले ठेवणे, त्यांचे संवर्धन करणे, ही पालिकेप्रमाणे शहरातील लोकांची, शहरातील नागरिकांचीही जबाबदारी आहे. त्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. यापुढे या तलावाची स्वच्छता दरआठवड्याला करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त केलेल्या मूर्ती एकत्र करण्यात आल्या. पालिकेचे १२ सफाई कर्मचारीही या मोहिमेत सहभागी झाले होते. या दोन तासांच्या श्रमदान मोहिमेतून चार टनहून अधिक कचरा गोळा करण्यात आला.