ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ मद्यपीची चार वाहनांना धडक
By जितेंद्र कालेकर | Updated: December 27, 2023 21:13 IST2023-12-27T21:13:45+5:302023-12-27T21:13:55+5:30
वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा

ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ मद्यपीची चार वाहनांना धडक
ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यातील खासगी निवासस्थाना जवळ लुईसवाडी भागात विशाल गुप्ता (२७) या मद्यपी चालकाच्या मोटारीने चार वाहनांना धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्री समोर आली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा १८५ नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी बुधवारी दिली.
विशाल हा मुख्यमंत्र्यांच्या घराजवळील लुईसवाडी परिसरात त्याची मोटार कार उभी करीत होता. यात त्याचे नियंत्रण सुटल्याने त्याच्या वाहनाची जवळच्या अन्य चार वाहनांना धडक बसली. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याच्यावर कारवाई केली. तपासणीमध्ये त्याने मद्य प्राशन केल्याचेही आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.