ठाण्यात चार वाहनांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:40 AM2021-03-18T04:40:30+5:302021-03-18T04:40:30+5:30

ठाणे : रस्त्यावर उभ्या केलेल्या चार मोटारसायकलींना आग लागल्याची घटना बुधवारी पहाटे ठाण्यातील वागळे इस्टेस्ट परिसरात घडली. या आगीत ...

Four vehicles set on fire in Thane | ठाण्यात चार वाहनांना आग

ठाण्यात चार वाहनांना आग

Next

ठाणे : रस्त्यावर उभ्या केलेल्या चार मोटारसायकलींना आग लागल्याची घटना बुधवारी पहाटे ठाण्यातील वागळे इस्टेस्ट परिसरात घडली. या आगीत चारही वाहने जळून खाक झाली असून, आगीचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.

ठाण्याच्या वागळे इस्टेस्ट, शिवाजीनगर परिसरात असलेल्या ज्योतिर्लिंग सोसायटी, रतनभाई कंपाउण्ड येथील रस्त्यावर चार दुचाकी वाहने उभी केली होती. या वाहनांना बुधवारी पहाटे ३.२० वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एक फायर इंजिन, एक क्यूआरव्ही वाहन पाचारण केले होते. त्यांनी घटनास्थळी दाखल होताच आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू केले. आग आटोक्यात येईपर्यंत चारही दुचाकी वाहने जळून खाक झाली होती. या आगीत कोणीही जखमी झाले नाही. ही आग लागली की लावण्यात आली हे अद्यापही समजू शकले नाही. याप्रकरणी पोलीस शोध घेत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

.............

Web Title: Four vehicles set on fire in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.