रिक्षाच्या दोन अपघातांमध्ये चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:53 AM2019-08-29T00:53:49+5:302019-08-29T00:53:53+5:30
दोन रिक्षाचालकांविरोधात गुन्हा दाखल : तीन जखमी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयांत दाखल
ठाणे : रिक्षाच्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चौघे जण जखमी झाल्याची घटना घोडबंदर रोड येथे घडली. याप्रकरणी वर्तकनगर आणि चितळसर या दोन पोलीस ठाण्यांत दोन रिक्षाचालकांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.
पहिल्या घटनेत भिवंडीच्या काल्हेर येथील रहिवासी रंगनाथ खटाळे हे कॅडबरी सिग्नलजवळून ज्युपिटर रुग्णालयाकडे जाणाऱ्या सेवारस्त्याने २६ आॅगस्टला रात्री ११.५० वाजता पायी जात होते. त्यांना एका रिक्षाने मागून धडक दिली. यात त्यांच्या दोन्ही पायांच्या पंजाला आणि गुडघ्याला मार लागला. याप्रकरणी त्यांनी अनोळखी रिक्षाचालकाविरुद्ध २७ आॅगस्टला वर्तकनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक डी.आर. कुंभार अधिक तपास करत आहेत.
पोखरण रोड क्रमांक दोन, गांधीनगर शिवसेना शाखेच्या समोरील रस्त्यावर २३ आॅगस्ट रोजी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाºया रिक्षाची एका दुभाजकाला धडक बसली. या अपघातामध्ये रिक्षातील तारा यादव (३३), जयप्रकाश दुबे (३३) आणि सीमा दुबे (३५, तिघे रा. चिरागनगर, ठाणे) हे जखमी झाले. यात तारा यांचे तीन दात तुटले. त्यांना ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल केले.चितळसर पोलिसांत अनोळखी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे.