स्वावलंबनाच्या शिकवणीनंतर चार महिलांनी केला देहव्यापार व्यवसायाचा त्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 07:07 PM2020-07-24T19:07:17+5:302020-07-24T19:07:34+5:30

भिवंडीत लॉकडाऊनचा असाही सकारात्मक उपयोग

Four women quit prostitution after teaching self-reliance | स्वावलंबनाच्या शिकवणीनंतर चार महिलांनी केला देहव्यापार व्यवसायाचा त्याग

स्वावलंबनाच्या शिकवणीनंतर चार महिलांनी केला देहव्यापार व्यवसायाचा त्याग

Next

नितिन पंडीत 

भिवंडी : देहव्यापाराच्या अंधकारमय यातनादायी जीवन जगताना कोरोना संकटात करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात या देहव्यापार करणाऱ्या महिलांना स्वावलंबनाचे धडे दिल्यानंतर त्यांच्याही जीवनात आशेचा किरण चमकू लागला असून देहव्यापार करणाऱ्या महिलांपैकी चार महिलांनी देहव्यापार सोडून सर्वसामान्य जीवन जगण्याचा संकल्प केला आहे . नुकताच एका संस्थेच्या माध्यमातुन या महिलांना स्वतःच्या चिची हाऊस घरात प्रवेश करून सर्वसामान्य जीवन जगण्याची नवी उमेद मिळाली आहे .

          भिवंडी शहरातील हनुमान टेकडी येथील 500 हुन अधिक देहव्यापार करणाऱ्या महिलांमुळे बदनाम झालेली वस्ती परंतु या ठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून श्री साई सेवा संस्थेच्या स्वाती (सिंग) खान यांनी चार वर्षांपूर्वी सामाजिक आरोग्य विषयक कार्यास सुरवात केली होती . त्यामुळे या महिलांशी या काळात स्वाती खान यांचे स्नेहाचे संबंध निर्माण झाले आहेत . मार्च महिन्यात देशभरात कोरोना विषाणूने थैमान घालण्यास सुरवात केल्या नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 25 मार्च पासून लॉकडाऊन ची घोषणा केली .या काळात असंख्य उद्योग व्यवसाय बंद असतानाच स्वाती खान यांच्या नेतृत्वाखाली येथील महिलांनी कोरोनाचा संसर्ग टाळावा यासाठी आपले रोजगार असलेला देहव्यापार व्यवसाय देखील बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या लॉकडाऊन काळात संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विविध समाजसेवी संस्थांनी या महिलांसाठी धान्य किराणा साहित्य आज पर्यंत पुरविले परंतु त्यांच्या पोटाची भूक भागवून स्वस्थ न बसता स्वाती खान यांनी या महिलांना काहीतरी रोजगार उपलब्ध करून देण्याचा चंग बांधला व येथील 25 महिलांना अगरबत्ती पॅकिंग ,दिवाळी शोभेची लायटिंग बनविणे या कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबनाचे धडे दिले. हळूहळू या कामातून पैसे मिळायला लागल्याने देहव्यापार करून जीवन व्यतीत करणाऱ्या चार महिलांनी देहव्यापार बंद करून सर्वसामान्य महिलांचे जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्वाती खान यांनी या परिसरातील चार खोल्या भाड्याने घेऊन त्यास रंगरंगोटी करून नव्या स्वरूपातील घर या महिलांच्या ताब्यात दिले. त्याचा लोकार्पण सोहळा व या महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा कार्यक्रम शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

          या महिलांनी देहव्यापार व्यासायचा त्याग करण्याचा निर्णय घेतल्या नंतर या महिलांचे समुपदेशन करून त्यांचा निर्धार ठाम आहे का याची खूणगाठ बांधून या महिलांच्या घरांची व्यवस्था करताना त्यांना पैशांसाठी कोणाकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही असा रोजगार त्यांना उपलब्ध करून देत या महिलांसाठी ' चिची हाऊस ' ची संकल्पना राबविनयेत आली आहे . चिची हाऊस या मल्याळम शब्दाचा अर्थ होतो बहिणीचे घर असे आहे.

 या महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याने मनाला आत्मिक समाधान मिळाले आहे अशी प्रतिक्रिया श्री साई सेवा संस्थेच्या प्रमुख स्वाती सिंग- खान यांनी दिली आहे . 

तर या देहव्यापार व्यवसायात तब्बल 14 वर्ष नरक यातना भोगलेल्या आहेत आता समाजाच्या मुख्य प्रवाहात दाखल होताना समाधान होत आहे आता आम्ही स्वावलंबी होऊन स्वतः च्या पायावर उभ्या राहू अशी प्रतिक्रिया एका 30 वर्षीय महिलेने दिली आहे. 

 

Web Title: Four women quit prostitution after teaching self-reliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.