चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 02:57 AM2017-12-14T02:57:44+5:302017-12-14T02:57:52+5:30

शेजारची लहान मुले दाराजवळ घाण करतात म्हणून एका ४ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिला बेदम मारहाण करत कच-याच्या ढिगा-यात टाकून दिल्याची खळबळजनक घटना भार्इंदरमध्ये घडली.

Four year old daughter abducted | चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून मारहाण

चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून मारहाण

Next

मीरा रोड : शेजारची लहान मुले दाराजवळ घाण करतात म्हणून एका ४ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिला बेदम मारहाण करत कच-याच्या ढिगा-यात टाकून दिल्याची खळबळजनक घटना भार्इंदरमध्ये घडली. पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी शेजारी राहणाºया १९ वर्षाच्या तरूणास अटक केली आहे.
आझादनगरला पालिकेच्या भूखंडावर बेकायदा झोपड्या, बांधकामे, कचºयाची गोदामे आहेत. तेथील कच्च्या झोपडीत इसरार शेख हे पत्नी, दोन मुले, दोन मुलींसह राहतात. शेजारच्या झोपड्यात काही कचरा - भंगार गोळा करणारे एकत्र राहतात. इसरार यांची मुले लहान असल्याने ते लघुशंका आदी शेजारच्या झोपड्यांजवळ करत असल्याने त्यावरून रहिम शौकत अली शेख (१९) याचे इसरार याच्याशी भांडण होत असे. रहीम हा लहान मुलांना देखील दमदाटी, शिवीगाळ करत असे.
मंगळवारी रात्री इसरार यांची ४ वर्षाची मुलगी आफरीन ही दिसत नसल्याने घरच्यांसह परिसरातील रहिवाशांनी तिच्या शोधासाठी धापवळ सुरू केली. आफरीन बेपत्ता असल्याचे नवघर पोलिसांना कळवले. त्यांनीही शोधाशोध सुरु केली. त्याचवेळी रहीमसुध्दा बेपत्ता होता.
आझादनगर मस्जिद मागील कचºयाच्या ढिगाºयातून विव्हळण्याचा आवाज तेथील एका रहिवाशाला आल्यानंतर पोलीस व अन्य लोकांनी धाव घेत पाहणी केली असता आफरीन ही जखमी व रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली आढळली. तिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिच्या डोक्यावर, चेहºयावर जखम झालेली आहे. डोक्याला पाच ठिकाणी जखमा झाल्या आहेत.
पोलीस व रहिवाशी हे रहीमचा शोध घेत असताना अनिस खान उर्फ मुन्ना, सलीम मनिहार आदींना रहीम हा क्रीडा संकुलामागील भागात लपलेला दिसला. नागरिकांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. आफरीन रात्री लघुशंकेसाठी गेली असता रहीमने तिला हटकले व रागाच्या भरात डोक्यावर रॉडने मारले. नंतर तिला कचºयात टाकून दिल्याची कबुली दिली.

हत्या व गुन्ह्यांना महापालिका जबाबदार ?
आझादनगर व मागील परिसर हा खेळाचे मैदान, सामाजिक वनीकरण या आरक्षणाखाली राखीव असून मोठ्या प्रमाणात पालिकेने टीडीआर देऊन जागा मिळवली आहे. परंतु या ठिकाणी झोपड्या, बांधकामे, भंगार व कचरयाची गोदामे आदींचे सर्रास अतिक्रमण झालेले असतानाही पालिका मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत या अतिक्रमणांना पाठीशी घालत आहे.
याआधी ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करून मृतदेह याच भागात टाकला होता. पवई येथून अपहरण करून आणलेल्या १० वर्षाच्या मुलासही येथे मारुन टाकले होते.
तरीदेखील पालिकेने या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात केले नसून भूखंडदेखील कुंपण घालून ताब्यात घेतलेला नाही. पालिकेच्या डोळेझाक पणामुळे येथे गंभीर स्वरुपाचे गुन्हे मात्र सतत घडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Four year old daughter abducted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा