चार वर्षाच्या मुलीला शिक्षिकेने केली मारहाण, मारकुट्या शिक्षिकेला पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 06:26 PM2017-09-17T18:26:39+5:302017-09-17T18:27:38+5:30

कल्याण-एका चार वर्षाच्या मुलीची शिकवणी घेणा-या शिक्षिकेने मुलीला मारहाण केल्याचा प्रकार घडला. या घटनेचा जाब विचारण्यासाठी पालकांसोबत शिवसैनिक बाजारपेठ पोलिस ठाण्यात गेला होता. त्याला पोलिस अधिका-याने मारहाण केली.

A four-year-old girl has been beaten by a teacher and the police has taken possession of a murderous teacher | चार वर्षाच्या मुलीला शिक्षिकेने केली मारहाण, मारकुट्या शिक्षिकेला पोलिसांनी घेतले ताब्यात

चार वर्षाच्या मुलीला शिक्षिकेने केली मारहाण, मारकुट्या शिक्षिकेला पोलिसांनी घेतले ताब्यात

Next

 कल्याण, दि. 17 -  कल्याण-एका चार वर्षाच्या मुलीची शिकवणी घेणा-या शिक्षिकेने मुलीला मारहाण केल्याचा प्रकार घडला. या घटनेचा जाब विचारण्यासाठी पालकांसोबत शिवसैनिक बाजारपेठ पोलिस ठाण्यात गेला होता. त्याला पोलिस अधिका-याने मारहाण केली. यामुळे अनेक शिवसैनिकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मुलीला मारहाण करणा-या शिक्षिकेस ताब्यात घेतले आहे. तसेच शिवसैनिकाला मारल्याचा इन्कार केला आहे. 

    शहराच्या पश्चिम भागातील रोहिदास वाडा येथे राहणारी देवश्री वाळंज ही चारवर्षाची मुलगी अलिशा सारंगधर या शिक्षिकेकडे शिकवणीला जाते. अलिशाने मुलीला मारहाण केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांसोबत शिवसेनेचे नेते दीपक सोनाळकर दाद मागण्यासाठी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गेले. यावेळी त्याठिकाणी वादंग होऊन वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर पासलकर यांनी सोनाळकर यांच्या श्रीमुखात लगावली. या मुळे वातावरण अधिक तापले. हा प्रकार कळताच शिवसैनिकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पासलकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी पासलकर यांनी सोनाळकर यांच्या श्रीमुखात मारलीच नसल्याचा खुलासा केला. तर सोनाळकर यांनी पासलकर हे खोटे बोलत असल्याचा आरोप केला. पोलिसांनी मुलीला मारहाण करणा-या अलिशा हिला चौकशीकरता ताब्यात घेतले आहे. 

Web Title: A four-year-old girl has been beaten by a teacher and the police has taken possession of a murderous teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.