चार वर्षांनंतर कळवा मेडिकल होणार सुरू
By admin | Published: January 18, 2016 01:57 AM2016-01-18T01:57:55+5:302016-01-18T01:57:55+5:30
कळवा रुग्णालयातील मागील चार वर्षांपासून बंद असलेल्या मेडिकल स्टोअरचा मार्ग अखेर आता खुला झाला आहे. स्थायी समितीने फेरप्रस्तावाला मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात
ठाणे : कळवा रुग्णालयातील मागील चार वर्षांपासून बंद असलेल्या मेडिकल स्टोअरचा मार्ग अखेर आता खुला झाला आहे. स्थायी समितीने फेरप्रस्तावाला मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात मान्यता दिल्यानंतर ते पुढील आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली. ते डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटल मेडिकल स्टोअर यांना चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यापोटी महिन्याला १४ लाख १० हजार म्हणजेच वर्षाला तब्बल १ कोटी ६७ लाखांचे भाडे पालिकेला मिळणार आहे. त्यानुसार, आता नव्या वर्षात या मेडिकलचा मार्ग मोकळा होणार आहे.
कळवा हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअर २०१२ च्या सुमारास बंद झाले होते. त्यानंतर, नव्याने निविदा मागविल्या होत्या. या निविदेनुसार महिनाकाठी ११ लाख भाड्याचा प्रस्ताव ९ नोव्हेंबर २०१२ रोजी स्थायी समितीकडे सादर केला होता. परंतु, तो नामंजूर करून फेरप्रस्ताव सादर करण्यास सांगितले. त्यानुसार, हा प्रस्ताव फेरसादर करीत असतानाच त्याच वेळेस कळवा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट वेल्फेअर यांनी न्यायालयात दावा दाखल केल्याने ही प्रक्रिया थांबली होती. अखेर, याचा निकाल ३० नोव्हेंबर २०१४ ला लागला.