तंबाखूविरोधी प्रचार करण्यासाठी ठाण्यातील चार तरुण करणार ठाणे ते मलेशिया रोड वे प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 04:07 PM2017-11-30T16:07:55+5:302017-11-30T16:12:00+5:30
ठाणे येथे राहणाऱ्या चार तरुणांनी क्विट टोबॅको मिशनसाठी भारत ते मलेशिया असा प्रवास स्वतःच्या वाहनाने संपुर्ण रोडने (६५०० कि.मी.) करायचा निश्र्चय केला आहे.
ठाणे: ‘क्वीट टोबॅको’ हा संदेश देण्यासाठी ठाण्यातील चार तरुण ठाणे ते मलेशिया असा स्वत:च्या चारचाकी वाहनाने रोड वेने प्रवास करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या ६५०० किमी प्रवासास आज सायं. ५ वा. ठाण्यातील कॅडबरी नाका येथून सुरूवात होणार आहे. रविंद्र अस्लेकर, सुनिल मोदगी, सुनिल शिंदे आणि शंतनू खेडकर अशी या चार तरुणांची नावे आहे.
क्विट टोबॅको हा संदेश भारतात नव्हे तर जागतिक पातळीवर पोहोचविणे असा या मोहिमेमागचा उद्देश आहे. या चार जणांपैकी रविंद्र अस्लेकर कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून बरे झाले आहेत. त्यांना तंबाखू सेवनामुळे हा आजार झाला होता, त्यांना या व्यसनाने मृत्युच्या दारात नेले होते. परंतू आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर रविंद्र हे या आजारातून बाहेर पडले आहे आणि या मोहिमेत तंबाखूविरोधीचा प्रचार इतर तीन जणांच्या सहभागाने ते करणार आहेत. ठाणे ते मलेशिया प्रवासाचा उद्देश फक्त प्रवास नसून तर क्विट टोबॅको हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचविणे या उद्देशाने ही मोहिम या तरुणांनी आखली आहे.मिळालेले नविन आयुष्य निर्व्यसनी राहून आनंदाने घालवण्याचा मानस रविंद्र यांनी व्यक्त केला आहे. आपल्यावर आलेले संकट अजून कोणावर येऊ नये म्हणून तंबाखुविरोधी प्रचार करण्यासाठी एक दीर्घ प्रवास करायचा निश्चय त्यांनी केला आहे. हे तरुण ठाणे येथून आपल्या प्रवासास सुरु वात करु न महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, नागालँड आणि मणिपूर अशी राज्ये फिरून मणिपूर मार्गे — म्यानमार — थायलंड —मलेशिया असा प्रवास स्वत:च्या गाडीने करु न नो टोबॅकोसाठी जास्तीतजास्त प्रसार करण्याचे या चौघांनी ठरविले आहे. या चारही तरुणांना या मोहिमेसाठी ठाण्यातील विविध मान्यवर उपस्थित राहून शुभेच्छा देणार आहेत.