बॅँक अधिकाऱ्याकडून फसवणूक

By admin | Published: April 5, 2016 01:12 AM2016-04-05T01:12:25+5:302016-04-05T01:12:25+5:30

पालघरच्या आयसीआयसीआय बँकेतील डेव्हलपमेंट आॅफिसर रघू तेजा श्रीनिवास मन्ने (२८), रा. विष्णुनगर, पालघर याने आपल्या ग्राहकांच्या ओळखीचा गैरफायदा घे

Fraud from bank officer | बॅँक अधिकाऱ्याकडून फसवणूक

बॅँक अधिकाऱ्याकडून फसवणूक

Next

पालघर : पालघरच्या आयसीआयसीआय बँकेतील डेव्हलपमेंट आॅफिसर रघू तेजा श्रीनिवास मन्ने (२८), रा. विष्णुनगर, पालघर याने आपल्या ग्राहकांच्या ओळखीचा गैरफायदा घेत त्यांच्या फिक्स डिपॉझिट ठेवीवर परस्पर लाखो रु.चे कर्ज काढून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याला रविवारी पालघर न्यायालयात हजर केले असता ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
पालघर येथील प्रकाश टॉकीजजवळील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेमध्ये डेव्हलपमेंट आॅफिसर म्हणून मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेला रघू मन्ने हा बीटेक आयटी अशा उच्चशिक्षित अधिकाऱ्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून अनेक ग्राहकांना बँकेशी जोडले होते. त्यामुळे त्याचे बँकेत चांगलेच वजन होते. त्याने पालघर, बोईसरमधील अनेक ग्राहकांना बँकेतील चांगल्या व्याजाची भुरळ घालून त्यांनी लाखो रुपयांच्या फिक्स डिपॉझिट ठेवी आपल्या बँकेत ठेवल्या होत्या.
बँकेतील अधिकारी संजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पालघर पो.स्टे.चे सहा. पो.नि. दीपक साळुंखे यांनी आरोपीला अटक केली आहे. सन २०१४ पासून फिक्स डिपॉझिटवर कर्ज काढून त्यावर मौजमजा करायची सवय आरोपीला जडली असून आतापर्यंत आठ ग्राहकांच्या ठेवीवर कर्ज काढल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. अजूनही काही ग्राहक पुढे येण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे सहा. पो.नि. साळुंखे यांनी सांगितले. आरोपीच्या वडिलाने या कर्जातील ५ लाखांची रक्कम भरली आहे. (वार्ताहर)

Web Title: Fraud from bank officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.