घाटकोपर येथील व्यावसायिकाची फसवणूक, गुन्हा दाखल : खोट्या स्वाक्ष-या भोवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 02:29 AM2018-01-23T02:29:14+5:302018-01-23T02:29:28+5:30

जमीन विकण्याच्या नावाखाली मालकाच्या बनावट सह्या करून घाटकोपर येथील एका व्यावसायिकाची ३ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक करणाºया भिवंडी येथील अमजद अन्सार गोरे याच्याविरुद्ध राबोडी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला.

 Fraud fraud in Ghatkopar, FIR filed: false signature | घाटकोपर येथील व्यावसायिकाची फसवणूक, गुन्हा दाखल : खोट्या स्वाक्ष-या भोवल्या

घाटकोपर येथील व्यावसायिकाची फसवणूक, गुन्हा दाखल : खोट्या स्वाक्ष-या भोवल्या

Next

ठाणे : जमीन विकण्याच्या नावाखाली मालकाच्या बनावट सह्या करून घाटकोपर येथील एका व्यावसायिकाची ३ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक करणाºया भिवंडी येथील अमजद अन्सार गोरे याच्याविरुद्ध राबोडी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला.
घाटकोपर येथील डॉक्टर चाळीत राहणारे सुरज रामलखन गुप्ता यांना २०११ मध्ये जमीन विकत घ्यायची होती. याबाबत मित्राला सांगताच मित्राने पडघा, तळवली येथील अमजद गोरे याच्याशी गुप्ता यांची भेट घालून दिली. अमजदने तळवली येथील एक जमीन विकायची असल्याचे सांगितले. या जागेची सर्व कागदपत्रे त्याने गुप्ता यांना दाखवली. या जागेचा व्यवहार ८ लाख ५० हजार रुपयांमध्ये निश्चित झाला. इसाºयाची रक्कम म्हणून ३ लाख ५० हजार रुपये गुप्ता यांनी दिले. उर्वरित ५ लाख रुपये खरेदीच्या वेळी देण्याचे ठरले. इसाºयाची रक्कम घेताना अमजदने मूळ जमीन मालकाच्या बनावट सह्या केल्या. साठेकरारामध्येही मालकाची खोटी सही केली. खरेदीसाठी पाच लाखांची जुळवाजुळव झाल्यानंतर गुप्ता यांनी अमजदशी संपर्क साधला असता, त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. गुप्ता यांना संशय आल्याने त्यांनी संबंधित तलाठी कार्यालयात जाऊन चौकशी केली असता अशा प्रकारच्या कोणत्याही व्यवहाराची तिथे नोंदच झाली नसल्याचे उघडकीस आले.

Web Title:  Fraud fraud in Ghatkopar, FIR filed: false signature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.